सुनेत्रा काकींना 93 टक्के मते मिळतील, रोहित पवार यांना विश्वास

बारामती पोटनिवडणुकीसह विविध राज्यांतील निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. अजित पवार यांनी केलेल्या विकासाच्या कामांमुळे आणि त्यांच्याबद्दल असलेल्या जनतेच्या प्रेमामुळे हा प्रतिसाद मिळत आहे. आम्हा सर्वांना विश्वास आहे की सुनेत्रा काकींना तब्बल 93 टक्के मते मिळतील.”

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 संदर्भात त्यांनी म्हटले की, “भाजप इतर पक्षांपेक्षा पुढे जाईल असे वाटत आहे. सुमारे 91 लाख मतदार मतदान करू शकले नाहीत, जे संविधानाच्या विरोधात आहे. तरीही ममता दीदी यांनी चांगली लढत दिली आहे.”

तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “तमिळनाडूमध्ये एक नवा नेता उदयास येत आहे, तो म्हणजे अभिनेते विजय. त्यांनी नुकताच सुरू केलेला पक्ष भाजपविरोधात असून सध्या आघाडी घेत आहे.”

केरळ विधानसभा निवडणूक 2026 संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काही ठिकाणी थोडेफार चढ-उतार सुरू आहेत.”

Comments are closed.