बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद अन् धक्काबुक्की; खासदार पार्थ पवारांची मध्यस्थी
बारामती NCP News: राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या समोरf राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचे समोर आले आहे. यात कार्यालयाचा अधिकारीयांनी एकमेकांनाही धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. बारामती (Baramati) शहर पदाधिकारी यांची आज खासदार पार्थ पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान आजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांचा वाद झाल्याची माहिती आहे. पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या सहयोग या निवासस्थानी हि बैठक बोलावली होती. यावेळी हा वाद झाल्याचे समजते आहे. फक्त हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. फक्त पार्थ पवारांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बारामती NCP News: बारामतीच्या निकालाआधीचं सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकले
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. पिंपरी चिंचवडमधील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी शहरात हे फ्लेक्स लावल्याची माहिती आहे. खरं तर बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विजय हा निश्चित मानला जातोय, त्यामुळं त्यांच्या समर्थकांकडून आधीच शुभेच्छाचे बॅनर लावायला सुरुवात झालीये.
NCP बातम्या: राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेवरून चांगलीच रस्सीखेच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या एका जागेवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं पाहिलं मिळत आहे. कारण पक्षाकडे जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती आहे. ही जागा आपल्या पदरात कशी पडेल, यासाठी इच्छुकांकडून सध्या वेगवेगळ्या क्लुपत्या लढवल्या जात आहे. सध्या अनेक इच्छुकानी आपण स्वत खासदार पार्थ पवार आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना न भेटता शिष्टमंडळाच्या माध्यमातून गळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही जणांकडून अजित पवारांनी जाहीर सभेच्या माध्यमातून दिलेल्या आश्वासनांचा व्हिडिओ समोर आणला जात आहे. तर काहींनी तर थेट सोशल मीडियात पत्र लिहून उमेदवारीची मागणी केली आहे.
पक्षातील वरिष्ठांकडे पक्षनिधी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये मोजण्याची तयारी
हेही नसे थोडके, काही जणांनी तर थेट पक्षातील वरिष्ठांकडे पक्षनिधी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे. तर काही जणाकडून जातीचा दाखला देत आत्तापर्यंत मराठा मुस्लिम समाजाला विधान परिषदेवर नेतृत्व देण्यात आलं मग दलित समुदायाला का नाही? असा सवाल उपस्थित करताना एमएमडी फॅक्टर राबवण्याची मागणी केली आहे. मागील काही दिवसांत उमेदवारिच्या मागणीसाठी सुनेत्रा पवार यांची भेट शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेणाऱ्यांमधे बुलढाणा जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, धाराशिव जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सुरेखा ठाकरे यांचा समावेश आहे. सुरेश बिराजदार यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन थेट अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी प्रचाराच्या निमित्ताने विधानपरिषदेवर घेण्याचा दिलेला शब्द याची आठवण करून दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.