प्रत्येक जण उठतोय अन् राजकारणाचे धडे देतोय, बागेश्वर बाबांनी…; संजय शिरसाट यांनी सुनावलं…
बागेश्वर महाराजांवर संजय शिरसाट: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज (Dhirendra Krishna Shastri) यांनी महाराजगिरी सोडून राजकारणात प्रवेश कराकिंवाप्रत्येक जण उठतो राजकारणाचे धडे देत आहे. शिवाजी महाराज (छत्रपती शिवाजी महाराज) थकले होते, तुम्हाला माहित आहे का? शिवाजी महाराज थकले होते असं म्हणून काही कल्पोकेल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे, अशी अभिप्राय सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे.
दरम्यानचार मूल पैदा करावे की सहा आता हेही यांनी ठरवावे का? अशा प्रकारचे वक्तव्य करून समध्येजाला काय दिशा द्यायची, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
Sanjay Shirsat : आम्हालाही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पहायचेहे
सुनेत्रा पवार यांचे भविष्य मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावले, या कार्यकर्त्यांच्या म्हणून भावनाताट. प्रत्येकाला वाटबस्स आपला नेता मोठा व्हावा. आम्हालाही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पहायचे आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, तर मग हि कार्यकर्त्यांची भावना असते, असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
Sanjay Shirsat on MNS : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलं पाहिजे
आमदार संजय गायकवाड यांनी त्यासंदर्भात कायद्याचे स्पष्टीकरण दिल आहे. परंतु नियमानुसार जी काय असेल ती कारवाई पोलीस करत आहेत. मनसेने आंदोलन केलं म्हणून संजय निरूपण यांनी विरोध केला की, काय म्हणून संजय निरुपमच्या विरोधात आंदोलनाहीहा आता राजकीय डावपेच त्या ठिकाणी चालला आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलं पाहिजे, हा आमचा सुद्धा आग्रह आहे. असे देखील संजय शिरसाट म्हणाले.
नेमकं काय म्हाणाले बागेश्वर महाराज? (छत्रपती शिवाजी महाराजांवर बागेश्वर महाराज)
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाहीय. तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा…तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाहीय. आता आम्हाला विश्राम हवा आहे. काही दिवस आम्हाला काहीच करायचे नाहीय. यावर हसत रामदास स्वामी म्हणाले की, ठीकंय…मी स्वीकार करतो. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की, तुम्ही माझे कोण आहात?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे. रामदास स्वामी म्हणाले, मी कोण आहे?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही आमचे गुरु आहात. मग रामदास स्वामींनी विचारलं, मग शिष्यचं कर्तव्य काय?, यावर शिवराय म्हणाले, जे गुरु आदेश देतील. यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातलं आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे, मी चालवणार…पण आज्ञा तुम्हाला आहे, तुम्हाला संचालन करायचं आहे, असा छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा किस्सा बागेश्वर महाराज यांनी सांगितला.
आणखी वाचा
Comments are closed.