RCBच्या विजयानंतरही मोठा धक्का! हेड कोच फ्लॉवरवर कारवाई, कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का, नेमकं का

BCCI ने RCB प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना का दंड ठोठावला: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हेड कोच अँडी फ्लॉवरला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शिवीगाळ केल्याप्रकरणी बीसीसीआयने शिक्षा ठोठावली आहे. सामन्यादरम्यान चौथ्या पंचांसोबत वाद घालताना फ्लॉवर शिवीगाळ करताना ऐकू आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीसीसीआयने त्याच्या मॅच फीमधून 15 टक्के रक्कम कापली असून, आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-1 नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.

नेमकं काय घडलं?

हा वाद रायपूरमध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात आरसीबीच्या डावातील 17व्या षटकात घडला. अल्लाह गजनफरच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याने लेग साइडला फटका मारला. सीमारेषेजवळ नमन धीरने चेंडू अडवून पुन्हा मैदानात फेकला. त्यावेळी जवळ उभा असलेला तिलक वर्मा झेल घेऊ शकला नाही. रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने नमन धीरचा प्रयत्न नियमांनुसार योग्य असल्याचे सांगत आरसीबीला एकही धाव दिली नाही.

थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे आरसीबीचा तंबू संतापला. फ्लॉवरसोबत वरिष्ठ फलंदाज विराट कोहली देखील चौथ्या पंचांकडे धाव घेताना दिसला. दोघांनी बराच वेळ तीव्र शब्दांत चर्चा केली. याच वेळी फ्लॉवरकडून शिवीगाळ झाल्याचे समोर आले. बीसीसीआयने त्याला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.3 अंतर्गत दोषी धरले. हा नियम सामन्यादरम्यान अश्लील किंवा अपमानास्पद भाषेच्या वापराशी संबंधित आहे. मॅच रेफरी अमित शर्मांसमोर झालेल्या सुनावणीत फ्लॉवरने आपली चूक मान्य केली.

मुंबई इंडियन्सचा दोन विकेट्सने पराभव

दरम्यान, या सामन्यात आरसीबीने अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा दोन विकेट्सने पराभव केला. 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कृणाल पांड्याने 73 धावांची दमदार खेळी केली. शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमार आणि रसिख सलाम यांच्या महत्त्वाच्या फटक्यांमुळे आरसीबीने अविश्वसनीय विजय खेचून आणला. या विजयामुळे आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली, तर मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले.

हे ही वाचा –

Hardik Pandya Fact Check : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं, फोटोही हटवले; सोशल मीडियावर दावा, नेमकं सत्य काय?

आणखी वाचा

Comments are closed.