टीम इंडियात येणार खतरनाक ट्विस्ट! 3 वर्षांनी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची कुजबुज, BCCIच्या बैठकी
भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना: आयपीएल 2026 संपल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मिशनवर उतरणार असून, पहिलं मोठं आव्हान अफगाणिस्तानचं असणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 1 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र या मालिकेआधीच भारतीय कसोटी संघाच्या भवितव्याबाबत बीसीसीआयमध्ये मोठी हालचाल सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात बीसीसीआय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेऊ शकते. या बैठकीत भारतीय कसोटी संघाच्या भविष्यासंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. टीम मॅनेजमेंटला आगामी प्रत्येक कसोटी सामन्यात सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन उतरवायची आहे, पण आयपीएल 2026 प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचतात यावरही निवड समितीचे बारकाईने लक्ष असणार आहे.
विशेषतः वेगवान गोलंदाजांच्या निवडीबाबत प्लेऑफनंतरच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या फक्त जसप्रीत बुमराहबाबत निर्णय निश्चित झाला आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून बाहेर पडल्यामुळे बुमराह प्लेऑफ खेळणार नाहीत.
दुसरीकडे, हर्षित राणा आणि आकाश दीप दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर राहिले. तर गुजरात टायटन्स जवळपास प्लेऑफमध्ये पोहोचली असून, त्यांचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे.
दरम्यान, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली असली तरी 2023 नंतर त्यांनी भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. रिपोर्टनुसार, निवड समिती आता शमींना पुन्हा संधी देण्याच्या विचारात नसल्याचं समजत आहे. याशिवाय बीसीसीआय काही युवा वेगवान गोलंदाजांवरही लक्ष ठेवून आहे. त्यामध्ये अंशुल कंबोज हे प्रमुख नाव असून, गुरनूर ब्रारलाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.