क्षणात होत्याचं नव्हतं झालं, बीडमधील भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पोलीस स्वप्नही अधुरे राहिल
बीड अपघात बातम्या: बीडमधून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Dhule-Solapur National Highway) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनासाठी सहा जण निघाले होते. मात्र नामलगाव फाटा (Namalgaon Phata) येथील उड्डाणपूलाजवळ भरधाव येणाऱ्या कंटेनरने या सहा जणांना उडवले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू (Beed Accident News) झाला, तर दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय.
पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे राहिले!
मिळालेल्या माहितीनुसारआकाश कोसळे, दिनेश पवार, विशाल काकडे, किशोर तावरे, अनिकेत शिंदे आणि पवन जगताप अशी मृतांची नावं आहेत. यातील सर्वजण पंचविशीच्या आतील आहेत. यातील काही तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. या अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मृत झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश करत हंबरडा फोडला. दरम्यान या दुर्दैवी घटनेने परिसरात एकाच शोककळा पसरली आहे. धुळे सोलापूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी गडी जवळ सहा तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले होते. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट निर्माण झाल्याने प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नाशिकमधील राड्याचं प्रकरण तापलं!
पोळा सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका परिसरात धोत्रे आणि निमसे गटात झालेल्या मारहाणीत राहुल धोत्रे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह सात जणांवर खुनाचा गुन्हाचे वाढीव कलम दाखल करण्यात आले आहे? दरम्यानउद्धव निमसे पोलीस दप्तरी फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केली आहेत. दुसरीकडे जोपर्यंत उद्धव निमसेला अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या कुटूंबियांनी घेतली आहे.
मृतांच्या कुटूंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
दरम्यानपोळा सणाच्या दिवशी दोन गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान शुक्रवारी राहुल धोत्रेचा मृत्यू झालाय. शवविच्छेदनसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मृतांच्या कुटूंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने प्रशासना समोर पेच निर्माण झाला असून जिल्हा रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.