बायकोपेक्षाही पूजाला जास्त जीव लावला, मृत्यूपूर्वी गोविंदाने मित्राला सांगितली धक्कादायक माहिती
बीड क्राइम न्यूज: बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्ये प्रकरणी रोज नवीन नवीन खुलासे होत आहे. गोविंद बर्गे (Govind Barge) यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या घरासमोर स्वत:च्याच चारचाकी गाडीमध्ये बसून आत्महत्या केली होती. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोविंदा बर्गे यांनी त्यांचे जवळचे मित्र चंद्रकांत शिंदे यांना आत्महत्या करण्याच्या आधी काही धक्कादायक माहिती दिली होती. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
पूजाने अचानक गोविंद बर्गे यांच्यासोबत बोलणे केले बंद
गोविंदा बर्गे हे गेल्या दीड वर्षापासून कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडच्या प्रेमात होते. यादरम्यानच्या काळात गोविंदने पूजाला आयफोन, प्लॉट, सोन्याचे नाणे आणि दागिने, बुलेट, शेतजमीन आणि तिचे सासुरे गावातील घर देखील बांधून दिले होते. मात्र, इतके करुनही पूजाने गोविंदसोबत बोलणे अचानक बंद केले आणि तो थेट नैराश्यात गेला. पूजाला बोलण्यासाठी तो सर्व प्रयत्न करत राहिला. गोविंद बर्गे याने नर्तकी पूजा गायकवाड हिच्या आईकडेही तिने बोलावं म्हणून सांगितलं होतं. मात्र, पूजा ही गेवराईतील बंगल्याच्या अटीवर अडली होती. तिला गोविंदचा गेवराईतील बंगला काहीही झाला तरीही पाहिजे होता. पूजा ऐकायला काहीही झाले तरीही तयार नव्हती. यामुळे गोविंद नैराश्यात गेला. गोविंदने आपल्या जवळच्या मित्राला याबद्दल सांगितलेही होते.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत शिंदे?
चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी पूजाला माझ्या सख्ख्या बायकोपेक्षाही जास्त जीव लावल्याचे गोविंद बर्ग म्हणाले होते. कितीतरी पैसे, सोन्याचे दागिने आणि नाणी घेऊन दिली, इतके करुनही ती शेतजमीन घेऊन दे किंवा गेवराईचा बंगला नावावर कर नाही तर तुझ्यावर खोटी बलात्काराची केस करते असे मला म्हणत आहे. मला ती खूप जास्त मानसिक त्रास देत आहे. मागील आठ दिवसापासून तिने माझे इनकमिंग कॉलही बंद केली आहेत अशी माहिती गोविंद बर्गे यांनी चंद्रकांत शिंदे यांनी दिली होती.
दरम्यान, आत्महत्या करण्याच्या काही वेळ अगोदरच पारगांव येथील तुळजाभवानी कला केंद्रात गोविंद बर्गे हे नर्तकी पूजाला भेटण्यासाठी गेले. मॅनेजरला पूजाला भेटायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पूजासोबत भेट होऊ शकत नसल्याने त्यांनी शेवटी पूजाच्या मैत्रीणीला फोन केला. शेवट ते पूजाच्या आईला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी पोहोचले. मात्र, पूजासोबत बोलणे होऊ शकत नसल्याने शेवटी आत्महत्या केल्याची घटना घडली.
नेमकं प्रकरण काय?
गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.
गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही.
महत्वाच्या बातम्या:
बीड क्राइम एक्सपी सरपनाच मृत्यू: नार्टाकी पुजन उगडलन तोंड, गोविंद बार्ज आणि तिचा लव्हबाबा.
आणखी वाचा
Comments are closed.