बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; पोलिसांसोबत आरोपीचे रिल्स व्हायरल
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) संपूर्ण बीड जिल्हा राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आला आहे. दरम्यान, बीडची गुन्हेगारी (Beed Crime) रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असतानाच, बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या नेकनुर पोलीस ठाणे हद्दीत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. दरम्यान हे संतापजनक कृत्य करणाऱ्या तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पवन निर्मळ असे या आरोपीचे नाव असून या घटनेनंतर तो फरार झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.
आरोपीचे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रिल्स, कुटुंबियांचा गंभीर आरोप
पुढे आलेल्या माहितीनुसार, पवन निर्मळने नात्यातीलच एका 14 वर्षीय मुलीच्या घरी जाऊन मुली सोबत अश्लील लैंगिक चाळे केले. कालांतराने घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिल्यानंतर पवन विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीचे अनेक रिल्स नेकनूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसोबत असल्याचे समोर आले आहे, आणि हेच रिल्स सध्या समाज माध्यमांवर व्हायरल देखील होतायत. आरोपीच्या अटकेसाठी नेकनूर पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र आरोपी हा पोलिसांच्या जवळचा असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीचे टोकाचे पाऊल
अशीच एक खळबळजनक घटना अकोला येथे घडली आहे. यात अकोल्यातील एका आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने आत्महत्या केलीये. अवंती भास्कर शेळके असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अकोल्यातील निशू नर्सरी शाळेची विद्यार्थिनी होती. अवंती ही अकोल्यातील संतोषनगर भागात रहात होतीय. आई-वडिल काही कामानिमित्त घराबाहेर गेलेले असतांना तिने घरात गळफास घेत आत्महत्या केलीय. तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिलीय.
मात्र, त्यात काय लिहिलेय याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीये. मात्र, चांगल्या सुशिक्षित कुटूंबातील 14 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्योसारखं टोकाचं पाऊल का उचललं?, याचा शोध सध्या पोलीस घेतायेत. मात्र या घटनेने अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. तर पीडित कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.