खोक्या भाईनंतर सुरेश धस आणखी एका गुंडामुळे अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

बीड: भाजपचे आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला, 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलीस त्याला थेट शिरूर कासार येथील बावी गावी घेऊन आले. ज्या माळरानावर ढाकणे पितापुत्रांना मारहाण करण्यात आली, तिथेच त्याला आणलं गेलं. ती जागा पोलिसांनी पाहिली. तसेच त्याला काही प्रश्नही विचारले. घटनाक्रम कसा होता याची माहितीही पोलिसांनी त्याच्याकडून घेतली गेली. सतीश भोसलेवर गुन्हा ढाकणे पितापुत्रांच्या मारहाणीसह, हरिणांच्या शिकारीचा गुन्हा दाखल आहे, ज्याचा वन विभाग तपास करत आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर जेरबंद झाला आणि त्याच्या घरावर बुलडोझरही चालला. आता त्यावरूनच राजकारण पेटलं आहे. वनविभागाच्या या कारवाईवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यात आघाडीवर आहेत सुरेश धस.

नेमकं प्रकरण काय?

लोकांना मारहाण करणारा, पैशांची मस्ती दाखवणारा खोक्या उर्फ सतीश भोसले अखेर जेरबंद झाला. इतके वर्ष गप्प असलेल्या वनविभागानंही त्यानंतर खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवला. त्यानंतर काही जणांनी त्याच्या घराची जाळपोळ केली. दुसरीकडे पोलिसांनी खोक्याला शिरूर कासारमधल्या बावी गावात घेऊन गेले. इथल्याच खोक्यानं ढाकणे पितापुत्रांना बेदम मारहाण केली होती. खोक्या हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता. त्याच धसांना खोक्याचा पुळका आलाय का असा प्रश्न पडावा.

खोक्याने बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याशिवाय विविध प्रकरणांत खोक्याविरोधात शिरूर, चकलांबा पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले. शुक्रवारी त्याला शिरूरच्या न्यायालयात हजर केले. हत्यार जप्त करणे, इतर आरोपी अटक करण्यासह इतर मुद्द्यांवर पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. यात त्याला 6 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आमदार धस यांनी शनिवारी पुन्हा खोक्याबाबत बोलताना त्याचे घर पाडायला घाईच केली. आपण या संदर्भात वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करणार, असे सांगत त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार धस पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाले.

खोक्याच नाही तर सुरेश धस आणखी एकामुळे अडचणीत

खोक्याच नाही तर सुरेश धस आणखी एकामुळे अडचणीत आले त्याचं नाव आहे आशिष विशाळ. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना मदतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र विशाळ हा आपला कार्यकर्ता नाही असं आता सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय.

धनंजय मुंडे असो, सुरेश धस असो अथवा संदीप क्षीरसागर बीड जिल्ह्यातल्या या लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीचे कारनामे एकापाठोपाठ एक समोर आले. त्याच बीडमधल्या वाढत्या गुंडगिरीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. धनंजय मुंडेंचं थेट नाव न घेता त्यांनी बीडमध्ये सत्तेचा गैरवापर झाल्याचं म्हटलं आहे. त्यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उत्तर दिलं आहे. बीड बदनाम करणाऱ्या वाल्मिक कराडची गँग, खोक्या यासारख्यांना कायमची अद्दल घडणं गरजेचं आहे. पण अशांना राजकीय वरदहस्त मिळत असेल तर ती मोठी चिंतेची बाब आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.