बीडचे SP नवनीत कॉवतांच्या घरात धक्कादायक प्रकार, आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प नाकात शिरला अन्…
बीड क्राइम न्यूज: बीड जिल्हा पोलीस दल मागील काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत आहे. अशातच आता बीड जिल्हा पोलीस दलातून आणखीन एक खळबळजनक आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थान परिसरात पोलीस कर्मचारी (Beed Police) चक्क गांजा ओढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी हे कृत्य करणाऱ्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारत थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई स्वत: पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी केलीय.
आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प नाकात शिरला अन्…
पुढे आलेल्या माहिती नुसार, बाळू गहीनाथ बहिरवाळ असे निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. याचीच पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुटुंबासमवेत येथे गेले होते. मात्र यावेळी बहिरवाळने गेट उघडलं नाही. काही वेळानंतर गेट उघडण्यात आलं आणि पोलीस अधीक्षकांनी आत प्रवेश केला.
दरम्यान, प्रवेश करताच त्यांना गांजाचा वास आला. त्यामुळे या पोलीस कर्मचार्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालात कर्मचाऱ्याने गांजा पिल्याच निष्पन्न झालं. याची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
एबीपी माझाच्या बातमीचा दणका, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त निलंबित
ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्य विकासासाठी नागपूर जिल्ह्यातील 100 महिला बचतगटांना 90 टक्के अनुदानावर शेतीपूरक साहित्य वितरित करण्यात आले. यासाठी प्रत्येक महिला गटांना 8 लाख 80 हजाराचे मळणी यंत्र, कल्टिव्हेटर, साठवणूक साहित्य वितरित करण्यात आले होते. यात बाबासाहेब देशमुख हे नागपूर सहाय्यक आयुक्त असतांना वर्ष 2022-23 महिला बचत गटासाठी जिल्हा खनिकर्म निधीतून कृषिपूरक साहित्य वाटपाची योजना राबवण्यात आली होती. मात्र समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलाबचत गटाला फोटो काढून व वितरित केलेले साहित्य दोन दिवसातच परत घेऊन महिला बचत गटांची फसवणूक केली.
दरम्यान हा प्रकार सिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने हि निलंबनाची कारवाई केली आहे. या संदर्भातील बातमी एबीपी माझाने लावून धरली होती. महिला बचतगटांना जेव्हा लक्षात आले कि आपली फसवणूक झाली, त्यानंतर महिलांनी आंदोलन उभे केले होते, समाजकल्याण विभागाने महिलांचा रोष बघता या प्रकरणाची चौकशी केली. मात्र दबावात तो चौकशी अहवाल सादरच करण्यात आला नव्हता. त्यांनतर एबीपी माझा ने महिला गटाच्या फसवणुकी बातमी दाखवली त्यानंतर सरकार ने याची दखल घेत कारवाईला वेग दिला. परिणामी आता या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.