‘गोल्ड लोन’ योजनेत दिलं खोटं सोनं; दोन महिन्यात जमवलं अडीच कोटींचं घबाड, लोकेशन शोधून बीडच्या


बीड: बनावट सोने चांदी बँकेत गहाण ठेवून बँकेची फसवणूक करणाऱ्या सोनाराला अखेर बीड पोलिसांनी पुण्यातून अटक (Beed Crime News) केली आहे. आरोपीने अवघ्या दोन महिन्यात तब्बल अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा (Beed Crime News)केले होते. विलास उदावंत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बीडमध्ये विलास ज्वेलर्स नावाने दुकान चालवत होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतः 16 बनावट ग्राहक (Beed Crime News) तयार केले. या ग्राहकांना बनावट सोने देऊन त्याने ते बँक ऑफ बडोदा बँकेत गहाण ठेवले. सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून त्याने हे बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेची फसवणूक केली. याबरोबरच सामान्य लोकांना जास्त सोन्याचे अमिष (Beed Crime News)दाखवून त्यांची ही फसवणूक केली. असे सर्व मिळून अडीच कोटी रुपये जमा करून तो बीड मधील प्रॉपर्टी विकून पसार झाला होता. (Beed Crime News)

Beed Crime News: त्याच्या ताब्यातून 18 किलो सोने-चांदी जप्त करण्यात आली

या प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या मागावर होते. गुप्त मिळालेल्या माहितीनुसार तो पुण्यातील देहू गाव येथे व्यंकटेश ज्वेलर्स नावाने दुकान चालवत असल्याचे समजले. मोबाईल लोकेशन वरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातून 18 किलो सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे.

Beed Crime News: नेमकं प्रकरण काय?

‘गोल्ड लोन’ योजनेचा गैरवापर करून बनावट सोने बँकेत गहाण ठेवून आणि सामान्य लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या या सोनाराला बीड शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. आरोपीने अवघ्या दोन महिन्यात तब्बल अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा केले होते. विलास उदावंत (रा. पंडितनगर, नगररोड, बीड) असे आरोपीचे नाव असून, तो बीडमध्ये ‘विलास ज्वेलर्स’ नावाचे दुकान चालवत होता. जलद श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतः १६ बनावट ग्राहक तयार केले. या ग्राहकांना बनावट सोने देऊन त्याने ते बैंक ऑफ बडोदा या बँकेत गहाण ठेवले. सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून त्याने हे बनावट सोने ‘खरे’ असल्याचे भासवून बँकेची फसवणूक केली. याचबरोबर, त्याने सामान्य लोकांना जास्त सोन्याचे आमिष दाखवून त्यांचीही फसवणूक केली आणि सर्व मिळून अडीच कोटी रुपये जमा करून तो येथील प्रॉपर्टी विकून पसार झाला होता.

बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त माहितीवरून तो पुणे येथील देहूगाव येथे ‘व्यंकटेश ज्वेलर्स’ नावाने दुकान चालवत असल्याचे समजले. बीड शहर पोलिसांनी त्याला तेथेच अटक करून त्याच्या ताब्यातून १८ किलो सोने जप्त केले आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे, तसेच बँकांना सोन्याचे परीक्षण करणाऱ्याची पूर्ण खात्री करून घेण्याची सूचना दिली.

आणखी वाचा

Comments are closed.