राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षाकडून भर चौकात कोंबड्याचा बळी; अंनिसच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
बीड क्राइम न्यूज: बीडच्या परळीतील अतिशय गजबजलेल्या चौकात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. परळी शहरातील कायम वर्दळ असलेल्या लक्ष्मीबाई टॉवर चौकात रस्त्याच्या मधोमध हळद कुंकू लिंबू टाकून कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेल्या दीपक देशमुख यांनी या प्रकार केला आहे. शुक्रवारी भर दुपारी ही घटना घडली असून या प्रकाराची (Crime News) संपूर्ण शहरभर चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान या अघोरी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनेची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmulan Samiti) घेतली असून महाराष्ट्र बळी व इतर अघोरी प्रथा, दूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये परळी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप; गुन्हा दाखल
पुढे आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या दुपारी परळी शहरात सप्तशृंगी देवीची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त परळीतील टॉवर ते गणेशपार भागात मिरवणूक काढण्यात आली. या मिरावणुकी दरम्यान माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी लक्ष्मीबाई टॉवरजवळ हळद-कुंकू, नागवेलीची पाने, कोंबडे व लिंबू कापले. हा अघोरी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर आक्षेप घेतला आणि याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी रानबा ढगे यांनी देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यानुसार देशमुखांविरुद्ध अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायरान जमिनीच्या वादातून चौघांकडून लाठ्या कुऱ्हाडीने कुटुंबावर हल्ला
बीडच्या गेवराई तालुक्यातील बगेवाडी शिवारात गायरान जमिनीच्या वादातून चौघांनी एका कुटुंबावर लाठ्या कुऱ्हाडीने हल्ला चढविला. या घटनेत कुटुंबातील दोन महिला आणि एक पुरुष जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. गंगुबाई भोसले या बागेवाडी शिवारात गायरान जमीन वहिती करतात. मात्र ही जमीन वहिती करायची नाही आणि तुमचे घर मोडून टाकायचे असं म्हणत चौघांनी भोसले कुटुंबावर हल्ला केला. या प्रकरणात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलीस आरोपींचा शोध घेतायत.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.