बीडमधील मावेजा गैरव्यवहारप्रकरणी 2 सरकारी अधिकारी निलंबित, कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढलं
बीड बातमी : बीड जिल्ह्यातील मावेजा गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतील दोघांना निलंबित करण्यात आले आहे. धुळे सोलापूर महामार्ग भूसंपादन (Land Acquisition) प्रकरणात वाढीव मावेजा लाटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून तब्बल 241 कोटींचा वाढीव मावेजा (Maveja) मंजूर करून घेण्यात आला होता. त्यातील 73 कोटी रुपयांचा मावेजा मिळवून अपहार (Scam) केल्याचा प्रकार उघड झाला होता. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे याप्रकरणात काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याप्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. (Beed Crime news)
या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सहाय्यक महसूल अधिकारी संजय हंगे (Sanjay Hange) आणि सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील यांना निलंबित केले. तर कंत्राटी कर्मचारी अविनाश चव्हाण, अजहर शेख आणि त्र्यंबक पिंगळे या तिघांची सेवा समाप्त केली. या प्रकरणात पाच वकिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पाचही वकील फरार आहेत. 73 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत केला जात आहे.
Beed Scam news: नेमकं प्रकरण काय?
या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेले सरकारी अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन तत्कालीन जिल्हाधिकारी यांचे नाव, पदनाम व खोटी स्वाक्षरी करुन लवाद आदेशाचे कव्हरिंग लेटरवर 154 प्रकरणात जवळपास 241 कोटी 62 लाख रुपयांचे बनावट आदेश निर्गमित केले. हे आदेश पारित करताना सुनावणीशी संबंधित संचिका, कोणतेही रजिस्टर, कार्यविवरण नोंदवहीतीली नोंदीबाबतची माहिती भूसंपादन कार्यालयात उपस्थित नव्हती. या बनावट आदेशाच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातून 73 कोटींची निधी मिळवला.
What is Maveja: मावेजा म्हणजे काय?
मावेजा म्हणजे जमिनीच्या मोबदल्यामध्ये मिळणारा वाढीव मोबदला किंवा भरपाईची रक्कम आहे. जेव्हा सिडकोसारख्या संस्था जमिनीचे संपादन करतात, तेव्हा जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून ही रक्कम दिली जाते. यामध्ये न्यायालयाच्या निकालानंतर शेतकऱ्यांना मिळणारी अतिरिक्त नुकसान भरपाईचाही समावेश असतो.
आणखी वाचा
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
आणखी वाचा
Comments are closed.