आई-वडील रागावले, मुलाने शेतात जाऊन गळ्याला दोर लावला,बहिणीने शेतात गेल्यावर पाहिलं अन्….

बीड: बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडील रागवल्याने एकुलत्या एक मुलाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराज हरिदास भगत असे 21 वर्षीय आत्महत्या (Beed Crime News) केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटना आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावात घडली आहे. घरातील कामाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरून विराजचे आई-वडील त्याच्यावर रागावले होते. याच रागातून विराजने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. (Beed Crime News)

शेतात गेलेल्या बहिणीला ही बाब निदर्शनास आल्यानंतर सदरील घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच आई-वडील (Beed Crime News) त्या ठिकाणी दाखल झाले. गळफास घेतलेली दोरी कापून विराजला रुग्णालयात  (Beed Crime News) दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शुल्लक कारणावरून विराजने आपले जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक माहिती घेतली जात आहे.(Beed Crime News)

Solapur Crime News: सोलापुरात सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध सासऱ्याची आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेच्या (Solapur Crime News) जाचाला कंटाळून ७३ वर्षीय वृद्ध सासऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी येथील उपळाई रोड परिसरात राहणारे सर्जेराव शंकर नायकुडे (वय ७३) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सुनेच्या सततच्या अपमानामुळे आणि मानसिक छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. (Solapur Crime News)

फिर्यादी महेश नायकुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उमेश नायकुडे यांची पत्नी सारिका उमेश नायकुडे ही किरकोळ कारणांवरून सासरे सर्जेराव नायकुडे यांचा वारंवार अपमान करत होती आणि “तुला घरातून हाकलून देईन” अशी धमकी देत होती. या सततच्या त्रासामुळे सर्जेराव नायकुडे मानसिक तणावाखाली होते. याचं तणावातून त्यानी आत्महत्या (Solapur Crime News)  केल्याचा आरोप आहे. दरम्यान, महेश नायकुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपी सून सारिका नायकुडे हिच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.(Solapur Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.