बीड पोलिसांनी खोक्याची रिमांड मागताना कोर्टात मांडले 7 मुद्दे, नेमकं काय म्हणाले?
बीड: मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला शुक्रवारी प्रयागराजवरुन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर खोक्या भाईला शिरुर-कासार येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीअंती न्यायालयाने सतीश भोसले (Satish Bhosale) याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता 20 मार्चपर्यंत खोक्याचा मुक्काम पोलीस कोठडीत असेल. यावेळी सतीश भोसले याच्या वकिलांनीही आपली बाजू मांडली. (Beed Crime)
सतीश भोसले हा बीडमधील जातीय राजकारणाचा बळी ठरला आहे. आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जात आहे. सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. तो पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एखाद्या मागासवर्गीयाने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? बीडमध्ये सध्या जे काही जातीचं राजकारण सुरू आहे त्याचा सतीश भोसले हा बळी ठरला आहे, असे खोक्या भाईचे वकील अंकुश कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, आता पुढच्या सुनावणीला पोलीस कोर्टात काय माहिती देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पोलिसांनी खोक्याची रिमांड मागताना न्यायालयात कोणते मुद्दे मांडले?
* सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून यात या आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग आहे.
* यावेळी मारहाण करताना कुऱ्हाड आणि सत्तुर जप्त करायची आहे. त्यासाठी या आरोपीची आम्हाला पोलीस कस्टडी हवी आहे.
* अटक करण्यात आलेल्या आरोपीचे इतर गुन्हेगारांशी काही संबंध येत आहे का, हे तपासायचे आहे.
* सदर गुन्हा हा शारीरिक व गंभीर स्वरूपाचा असून सदर गुन्ह्यात आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची तक्रार असल्याने पुण्यामध्ये वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार तपासणी कामी जप्त करायचे आहे.
* सदर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यातील सर्व आरोपी फरार आहेत.
* यातील आरोपी फरार असताना त्याला फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली याचा तपास करायचा आहे.
* याव्यतिरिक्त नमूद गुन्ह्यात आरोपीच्या सहभागाची सखोल चौकशी करायची आहे म्हणून पोलीस कस्टडी हवी आहे.
खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
आम्हाला पोलिसांची कायेदशीर चौकशी मान्य आहे. पण बुलडोझरने आमचे घर पाडणे योग्य नव्हते. आमचं घर पाडल्यानंतर चार-पाच दिवसांनी ते पेटवून देण्यात आल्याची बातमी समोर आली. त्यामुळे आम्ही आज इतक्या तातडीने शिरुर-कासार या गावात आलो. घर पेटवून देताना घरातील लहान मुलींनाही मारण्यात आले, त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता सरकारने आम्हाला न्याय मिळून द्यावा, अशी मागणी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बहिणीने केली.
https://www.youtube.com/watch?v=zephohhrcjqo
आणखी वाचा
सतीश भोसले सामाजिक कार्यकर्ता, वकिलांचा दावा; खोक्याला सहा दिवसांची कोठडी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
अधिक पाहा..
Comments are closed.