सतीश उर्फ खोक्या भोसलेची निर्दोष सुटका, वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर येताच बनवली आणखी एक रील्स
सतीश भोसले निर्दोष भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या (Khokya) तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर पडलाय. एका व्यक्तीला बॅटने मारहाण या बरोबरच शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या मागील वर्षभरापासून कारागृहात होता. सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच दरम्यान एका व्यक्तीला आपल्या साथीदारासोबत बॅटने अमानुष मारहाण करताना खोक्या भोसलेचा व्हिडिओ समोर आला. याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेत खोक्याला अटक केली. या प्रकरणासोबतच शिरूर तालुक्यातील पिता-पुत्रांना मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार करून हरणाचे मांस घरात आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. (Beed Crime)
Khokya Bhosale : गाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडल, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, खोक्या भोसलेचा लॅविश थाट
सोबतचगाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडल दाखवणे, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री आणि पंचतारांकित हॉटेल मधील लॅविश लाइफस्टाइल, असा थाट खोक्या भोसलेचा रिल्समधून समोर आला होता. खोक्या भोसले कारागृहात असताना त्याचे शिरूर मधील वनविभागाच्या जागेत असलेले ग्लास हाऊस जमीनदोस्त करण्यात आले. तर काही अज्ञातांनी त्याच ठिकाणी आग लावली होती. यावेळी सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबाची भेट घेतली.
दरम्यान वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर बॅटने मारहाण केल्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. कारागृहा बाहेर पडताच खोक्या भोसलेची आणखी एक रील्स चांगलीच व्हायरल होत आहे.
Satish Khokya Bhosale : कोण आहे खोक्या उर्फ सतीश भोसले?
दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय होता. भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी अशी त्याची ओळख आहे. सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी समाज माध्यमांवर दहशत पसरवणारे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. वनविभागाची कारवाई व घरात सापडलेल्या ऐवजामुळे बीडमध्ये व राज्यभर खोक्या भाईची एकच चर्चा होती. बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणाला बॅटने बेदम मारहाण केलेल्या प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केलाय.
आणखी वाचा
Comments are closed.