बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पु

बीड क्राईमचा विवाहितेवर बलात्कार. बीडमध्ये पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे.  बीड तालुक्यातील एका गावात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करत तिला गावच्या चावडीत बांधून ठेवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पीडित तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस तपासादरम्यान ही तरुणी अल्पवयीन असून ती विवाहित (Married) असल्याचं समोर आले आहे.  पीडित तरुणी आपल्या पतीसोबत रात्री घरात झोपली असताना आरोपीने घरात घुसून तिला गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार (Rape news) केला. त्यानंतर तिला गावच्या चावडीवरील खांबाला बांधून ठेवले गेले. हा प्रकार ग्रामस्थांच्या सकाळी निदर्शनास आला, त्यानंतही बराचवेळ तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. अखेर नातेवाईकांकडून पीडितेची सुटका करण्यात आली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत वैभव पटेकर नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Maharashtra Crime news)

ही घटना 10 मार्च रोजी घडली होती. मात्र, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी भीतीपोटी दोन दिवस ही घटना लपवून ठेवली होती. अखेर दोन दिवसांनी मुलीने आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपी वैभव पटेकर याला ताब्यात घेतले आहे.

या तरुणीला गावच्या चावडीसमोर बांधून ठेवल्याचा जो व्हिडीओ आहे, त्यामध्ये तिच्या हाताला आणि पायाला दोरखंड बांधल्याचे दिसत आहे. पोलीस चौकशीत ही विवाहित तरुणी अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या या पीडित तरुणीची आणि आरोपीची चौकशी करत आहेत. या चौकशीतून आता कोणत्या नवीन गोष्टी समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Crime news: नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही बीड जिल्ह्यात पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली आहे. गरम होत असल्याने रात्रीच्या वेळी महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी हा पीडित महिलेच्या घरात शिरला. घरात सर्वजण झोपले होते. आरोपीने घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत गावाबाहेर नेले. आरोपीने हे कृत्य करत असताना पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने तिचं तोंड हाताने घट्ट दाबलं. यानंतर आरोपी गावाबाहेरच्या नदीपात्रात पीडितेला घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेवर अत्याचार केला. त्यावेळी ही तरुणी बेशुद्ध झाली. ही विवाहित तरुणी 17 वर्षांची आहे. तिचा बालविवाह झाला होता. अत्याचार केल्यानंतर आरोपी वैभव पटेकर याने तिला गावच्या चावडीसमोर आणून बांधून ठेवले. सकाळी शुद्धीत आल्यानंतर या तरुणीने मदतीसाठी याचना केली. मात्र, गावकऱ्यांनी तिला मदत केली नाही. अखेर तिच्या नातेवाईकांनी तिला तिथून सोडवून घरी नेले.

आणखी वाचा

पायात महागडी चप्पल, शर्टचं पहिलं बटण उघडं अन् चेहऱ्यावर बेदरकार भाव; सरपंच संतोष देशमुखांचा मारेकरी जयराम चाटेच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा

आणखी वाचा

Comments are closed.