वाल्मिक कराडच्या गुंडांची महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण, जुगाराला विरोध केल्यामुळे कृत्य
बीडमध्ये महिलांना मारहाण : बीड जिल्ह्यातून कायद्याची सुव्यवस्था धाब्यावर बसवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रंजेगाव येथे घरासमोर लघुशंकेला आणि जुगाराच्या अड्ड्याला आणि गुंडगिरीला विरोध केल्याच्या कारणावरून एका असहाय्य महिलेला नराधम गुंडांनी अमानुषपणे मारहाण केली. शरीरावर जखमा दिसू नयेत म्हणून या गुंडांनी महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप पीडित महिलेनं केला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मुख्य आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी वाल्मिक कराडचे समर्थक असून कराडसोबतचे त्यांचे फोटो आता व्हायरल होत आहेत.
Gambling Dispute Background : लहान मुलांवर वाईट परिणाम, म्हणून विरोध
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रंजेगाव परिसरात काही गुंड उघडपणे जुगाराचे अड्डे चालवत आहेत. या गावात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यामुळे आणि तिथे येणाऱ्या गुंडांच्या राड्यामुळे गावातील लहान आणि शाळकरी मुलांवर अत्यंत वाईट तसेच हिंसक परिणाम होत आहे, अशी भूमिका घेत संबंधित महिलेने या अवैध धंद्याला जाहीर विरोध केला होता. याच गोष्टीचा प्रचंड राग गावातील गावगुंडांच्या मनात होता.
Pimpalner Police Case : घरासमोर लघुशंका केली, जाब विचारताच हल्ला
घटनेच्या दिवशी आरोपींनी थेट पीडित महिलेच्या घरासमोर येऊन उद्दामपणे लघुशंका केली. आपल्या घरासमोर सुरू असलेल्या या घाणेरड्या प्रकाराबद्दल जेव्हा महिलेने त्या गुंडांना जाब विचारला, तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. यावेळी मुख्य आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून त्या महिलेला घेरले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीचे व्रण किंवा खुणा बाहेरून शरीरावर दिसू नयेत, या क्रूर हेतूने आरोपींनी त्या महिलेच्या गुप्तांगावर बेल्टनं अत्यंत अमानुषपणे प्रहार केले. त्यावेळी आईला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या दोन निष्पाप लहान मुलांनाही नराधम आरोपींनी उचलून जमिनीवर फेकून दिले. सुदैवाने या घटनेत मुलांना किरकोळ इजा झाली असून ते सुखरूप आहेत.
Beed Crime Walmik Karad Connection : राजकीय नेत्यासोबतचे फोटो व्हायरल; पोलिसांवर संशय
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात (Pimpalner Police Station) आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या साथीदारांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी निखिल आबूज गुंड वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक असल्याचं बोललं जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचे वाल्मिक कराड सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामुळेच राजकीय दबावापोटी पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Beed Hospital Treatment Update : शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
गुंडांच्या या अमानुष हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेला तातडीने बीडच्या शासकीय रुग्णालयात (Beed Government Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, सध्या तिच्यावर तिथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पिंपळनेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असला, तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गावात दहशत निर्माण करणाऱ्या या नराधम आरोपींना तात्काळ बेड्या ठोकून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.