मोठी बातमी : बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार, पोलिसांची घटनास्
बीड गुन्हा: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बीडमधील (Beed News) गुन्हेगारीचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोर आले होते. यावेळी सुरक्षारक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबारात एक जण जखमी
सदर घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर गोळीबारात एक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. दरम्यान, सुरक्षारक्षकाने नेमका गोळीबार का केला? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांच्या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=Schc-xwdzgk
बीडच्या गुन्हेगारीवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
दरम्यान, बीडमधील वाढत्या गुहेगारीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. बीडमध्ये वाढती गुन्हेगारी अतिशय गंभीर आहे. काही केल्या त्याला आळा बसत नाही. पवनचक्कीच्या वादातून हा प्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून अजूनही पोलिसांनी कोणताही धडा घेतलेला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गुंडांची धमक वाढली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे कधी थांबेल? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.