बीडच्या जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल; बॉम्बशोधक पथक दाखल, झाडाझडती सुरू
सोमवारचा दिवस आठवड्याचा कामाचा वार, सगळं काही वेळेत सुरू होतं. अचानक सकाळी ११.३० च्या सुमारास बीडच्या न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल आला आणि एकच खळबळ उडली. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांची कुमक तैनात झाली. अवघ्या काही सेकंदामध्ये संपूर्ण न्यायालय रिकामे करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाला दाखल करण्यात आले. युद्ध पातळीवर झाडाझडती सुरू झाली.
रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी न्यायालय गजबजलेले होते. न्यायालयात नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ होती. त्याचवेळी न्यायालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल प्राप्त झाला आणि एकच खळबळ उडाली. अवघ्या काही सेकंदामध्ये या घटनेची माहिती संपूर्ण न्यायालयात पसरली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण न्यायालय रिकामे करण्यात आले. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले. सर्वत्र झाडाझडती सुरू झाली. मेल कुठून आला, कोणी पाठवला याचा तपास सुरू झाला. बीडच्या न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल पहिल्यांदाच पाठवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.
Comments are closed.