लग्नकार्याला जाताना एर्टिगा कार पलटली; भीषण अपघातात 2 ठार, 4 जण गंभीर जखमी

बीड: जिल्ह्याीतल अंबाजोगाई-आडस मार्गावर झालेल्या अपघातात (Accident) दोन जण ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी आहे. अंबाजोगाई-आडस रस्त्यावरील उमराई पाटीजवळ आज दुपारी एक भीषण अपघात घडला. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एर्टिगा कार पलटून झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेले  कंपाउंडला धडकून 32 सीटर मिनी बस पलटी झाली आहे. या अपघातात लग्नासाठी निघालेल्या बसमधील 23 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान, अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एक कुटुंब विवाहासाठी एर्टिगा कारमधून (एमएच 05 सीव्ही 9186) अंबाजोगाई येथे येत होते. त्यावेळी उमराई पाटी परिसरातील दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक कारसमोर आला. याच दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. या अपघातात शौकत अहमद शेख (वय 46) आणि खय्युम अब्बास अत्तार (वय 45) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

32 सीटर मिनी बस पलटी, प्रवासी जखमी

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेले  कंपाउंडला धडकून 32 सीटर मिनी बस पलटी झाली आहे. या अपघातात लग्नासाठी निघालेल्या बसमधील 23 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आहे. जखमींवर खेडशिवापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोर येथून पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील कानिफनाथ मंगल कार्यालयामध्ये लग्नाच्या कार्यक्रमासाठी या बसमधून 32 वऱ्हाडी निघाले होते. शिंदेवाडी-पठारवाडी ते बोपगाव या दुर्गम रस्त्यावर चतुर्मुख महादेव मंदिराच्या पायथ्याशी आल्यावर या बसचा अपघात झाला. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच कंपाउंड केले आहे. त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला धडकली. त्यातील चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक व बसमधील लोकांकडून देण्यात आलीय. यासंदर्भात अद्याप सासवड पोलिसात कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.

हेही वाचा

ज्या लोकांना भविष्य दिसत नाही ते इकडे तिकडे जातील; राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशावेळी नेमकं काय म्हणाले जयंत पाटील

अधिक पाहा..

Comments are closed.