मुंबईच्या सराफास बीड पोलिसांनी लुटलं, API ने धमकी देऊन चार लाख उकळले, आणखी तीन लाखांची मागणी


बीड : सातत्याने गुन्हेगारी कारवायांसाठी चर्चेत असलेले बीड आता पोलिसांच्या कृतीमुळे (बीड पोलीस) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुंबईतील सराफ व्यापाऱ्यास बीडच्या शिवाजीनगर ठाण्यातील (बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशन) काही पोलिसांनी चार लाखांना लुटल्याची घटना घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी गजानन क्षीरसागर (गजानन क्षीरसागर PSI) याच्यासह इतर पोलिसांनी व्यापाऱ्यास धमकी देऊन त्याच्याकडून पैसे काढले. यासंबंधीची तक्रार आता पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

बीड गुन्हे: सात लाखांची मागणी केली

मुंबई येथील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे २४ नोव्हेंबर रोजी बीड शहरातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले. त्यांच्याकडे असलेल्या सोने मालासह मोबाईल ताब्यात घेऊन तो स्वीच ऑफ केला. दबाव टाकत सात लाख रुपयांची मागणी केली.

मयंक जैन यांना मेडिकलचे कारण सांगून बीडमधीलच दुसऱ्या व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये मागवण्यास सांगितले. त चार लाखत्यांची रुपये रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी घेतली आणि इतर तीन लाख रुपये दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजेपर्यंत आणून दे असं सांगितलं.

बीड खंडणी प्रकरण : दुसऱ्या लॉजवर डांबून ठेवलं

धमकी दिल्यानंतर मयंक जैन यांना पोलिसांनी दुसऱ्या लॉजवर रात्रभर डांबून ठेवलं आणि सकाळी सोडून दिलं. सुटका झाल्यानंतर मयंक जैन यांनी आपबिती त्यांच्या व्यापारी मित्रांना सांगितली. त्यानंतर या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली.

या प्रकरणात आरोपी पोलिसांना पाठीशी न घातला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सराफा असोसिएशनने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून यामधील सत्य काय ते लवकरच समोर येईल.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.