बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या धर्मांतर प्रकरण; कारागृह अधीक्षकांची अखेर उचलबांगडी
बीड गुन्हा: बीडच्या कारागृहातील (Beed Jail) कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असलेल्या आणि याच प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांना उपाधीक्षक म्हणून नागपूरला पाठविण्यात आले आहे. बीड (Beed) कारागृहात आल्यापासून पेट्रस गायकवाड कायम वादग्रस्त ठरले होते. कारागृहातील झाडे तोडणे, कैद्यांकडून खाजगी कामे करून घेणे, यासोबतच पेट्रस गायकवाड वर सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कारागृहातील कैद्याच्या वकिलांनी तक्रारी देखील केल्या होत्या. अखेर शासनाने त्यांची उचलबांगडी केली आहे.
गूस्कड पडलकर चालू) झेल: सुपरच्या अधीक्षकांविरूद्ध एमएलए गोपीचंद पडलकर
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह (Beed Jail) अधीक्षकांवर गंभीर आरोप केला होता. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकरांनी केला होता. या पाठोपाठ बीडच्या कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन (conversion) करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला होता. त्यांनतर बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप केले होते. यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिणामी आता अखेर या प्रकारणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे?
Beed Jail : वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर उचलबांगडी
दरम्यान, गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, बीडचे तुरुंग अधिकारी धर्मांतराचं काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे. ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबलमधले श्लोक लिहिले आहेत. कैदी जेलमध्ये भजन, कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकले आहे. तसेच तिकडे त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी भेटायला येतो. कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा, तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत. बीडमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्याची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं, अशी मागणी त्यांनी केली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.