मोठी बातमी : बीडमध्ये सरकारी वकिलाने कोर्टातच जीवन संपवलं, आता कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट

बीड: जिल्ह्याच्या वडवणी (Beed) येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडल होती. आता याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही.एल. चंदेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी (Police) आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीत नेमका काय उल्लेख आहे, तो आम्हाला माहिती नाही. परंतु, जे कुणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंदेल कुटुंबीयांनी केली आहे.

या संपूर्ण आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी मृत सरकारी वकील चंदेल यांच्या कुटुंबीयांनी केली. दरम्यान, वडवणी पोलिसांनीही चिठ्ठी मिळाल्याचा दुजोरा दिला आहे. मात्र, चिठ्ठीसंदर्भात आत्ताच माहिती देता येणार नाही, असे म्हटल्याने चंदेल यांच्या मृत्यू गूढ आणखी वाढले आहे. चंदेल हे स्वभावाने अतिशय चांगले आणि मनमिळाऊ होते, ते असे काही करणार नाहीत, त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. त्यामुळे सरकारकडून याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटून गावकरी निवेदनही देणार आहेत.

घटनेची सीआयडी चौकशी व्हावी

बीड जिल्ह्याच्या वडवडणी येथील न्यायालयात सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारास 11 वाजता उघडकीस आली. न्यायालयाच्या खिडकीला शाल बांधून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे पाहायला मिळालं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, या मृत्यूप्रकरणी आता गूढ वाढले असून कुटुंबीयांनी घटनेच्या सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.दरम्यान, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सरकारी वकिलाने अशा ठिकाणी आत्महत्या केल्याने न्यायालयीन वर्तुळात वकिलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

हिंजवडीतील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी; स्वतःची नवीन कंपनी थाटली, 100 हून अधिक वेबसाईट विकल्या अन्…, समोर आलं कांड

आणखी वाचा

Comments are closed.