बीडमध्ये रात्री मोठा राडा, दीपक देशमुखांचा नगरपरिषद कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप, कार्यकर्त्यांची घो
बीड वार्ता: बीडच्या परळीमध्ये (Parli) स्ट्राँग रूम असलेल्या नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख (Deepak Deshmukh) आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले. यावेळी रात्री नगरपरिषद कार्यालयासमोर तणावाचे वातावरण झाले होते.
बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्राँगची पाहणी करण्यासाठी गेले असताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यावर केला. यावेळी नगरपरिषदेसमोर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले. दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान शिवीगाळीचा आरोप केलेल्या कर्मचाऱ्याचे मेडिकल करण्याची मागणी यावेळी देशमुख यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांना फोनवरून त्यांनी दिली.
Beed News: पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीमार
यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नये, याकरिता गेट बाहेर उभ्या असलेल्या जमावावर सौम्य लाठीमार केला. साधारण दोन तास या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. नगरपरिषदेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मणी NWS: Curgeary Te Grops Infest
याआधी बुधवारी सकाळी नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपरिषद इमारतीत असलेल्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीनमध्ये ठेवण्यात आल्या. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यावर आमचा विश्वास नसल्याचे सांगत आमची राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी देखील दीपक देशमुख यांनी केली होती. त्यानंतर या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज उमेदवाराला पाहता यावे, यासाठी खाली असलेल्या पार्किंगमध्ये टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काल रात्री झालेल्या राड्यामुळे नगरपरिषदेसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Gondia News: सालेकसा ईव्हीएम छेडछाड आरोप प्रकरणात मोठी अपडेट
दरम्यान, गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव करून याविषयी स्पष्टीकरण मागितले होते. त्यावरून जवळपास 12 तास आंदोलन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणातील अहवाल हा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवला आणि राज्य निवडणुकाला आयोगाला पाठवण्यात आला. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग यावर कोणतं निर्णय घेते? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून वोट टेम्परिंग तर झाली नाही ना? असा संशय व्यक्त केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.