सतीश भोसले उर्फ खोक्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं, पोलीस खोक्यासह बीडकडे रवाना

छत्रपती संभाजीनगर : बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्याला दोन दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती. काल प्रयागराजमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर सतीश भोसलेचा ताबा बीड पोलिसांना मिळाला आहे. बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले आहेत.  पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला बीडला घेऊन जातील, अशी माहिती आहे. काल रात्री खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं गेलं आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.