एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं!
भंडारा अपघात बातम्या: भंडाऱ्याच्या वाहनी गावातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात एका भरधाव एसटी बसनं महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. यात पतीसह दोन मुलं किरकोळ जखमी झाले असून चिरडल्या (Accident News) गेलेल्या पत्नीचा घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे. ही भीषण घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वाहनी या गावात आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पत्नीचा घटनास्थळीचं मृत्यू , पतीसह दोन मुलं किरकोळ जखमी
पुढे आलेल्या माहितीनुसार, मीना होमेश्वर कडू ( वय वर्ष 32) असं मृतक महिलेचं नाव आहे. होमेश्वर कडू हे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा इथून दुचाकीनं पत्नी आणि दोन मुलांसह भंडाऱ्याच्या चिखला या त्यांच्या मूळ गावी येत असताना वाहनी या गावात ही घटना घडली. सिहोरा पोलिसांनी बस चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून बस ताब्यात घेतली आहे. सध्या पोलीस या घटनेचा आधिक तपास करत आहेत.
पाणी पुरवठ्याच्या टाकीला गळती, मोठी दुर्घटना होण्याची भीती
भंडाऱ्याच्या साकोली येथील नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकीला गळती लागली आहे. यामुळं टाकीतून पाणी वाहत असल्यानं ती जीर्ण झाल्यानं कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वॉर्डातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. साकोली शहरातील जुनी साकोली इथं ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या या पाण्याच्या टाकीतून जुनी साकोली, सिव्हील वॉर्ड, गणेश वॉर्ड परिसरातील नळ जोडनिधारकांना पाण्याचा पुरवठा केल्या जातोय. या जीर्ण टाकीचे सिमेंट काँक्रीटचे तुकडे पडायला सुरुवात झाली असून टाकीला चारही बाजूंनी छिद्र पडले असून तिथून पाणी गळती होत आहे. टाकीच्या परिसरात नागरिकांची मोठी वसाहत असल्यानं ती कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं ही टाकी तातडीनं पाडवी आणि नागरिकांसाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था नगर परिषदेने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वर्ध्यात रात्री दुमजली इमारत कोसळली
वर्ध्याच्या गोल मार्केटला लागून असणाऱ्या एका पडीक दुमजली इमारतीचा ढाचा अचानक कोसळला. रात्रीची वेळ असल्यानं याठिकाणी कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. मात्र दुचाकी व चारचाकी वाहन मलब्याखाली दबल्या गेले. रात्रीला कोसळलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.