कुंपणानेच शेत खाल्लं! वनाधिकाऱ्याचा रजेचा अर्ज करून चक्क वाळू तस्करी; वाळूचा टीप्पर पळवला


भंडारा क्राईम न्यूज : भंडाऱ्याच्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास वाळूचा उपसा करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन वाळू तस्करांना भंडाऱ्याच्या लाखनी पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे वाळू तस्करीत अटक करण्यात आलेल्यामध्ये हरीश शेंडे (40), प्रितेश झलके (24) या दोघांसह भंडारा वन विभागात कार्यरत वन कर्माचारी सुधीर हुकरे (32) यांचाहे समावेश आहे. सुधीर हुकरे हा वनरक्षक असून तो मोहाडी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, वनरक्षक सुधीर हुकरे यानं कौटुंबिक कारणाचा बहाना करून वनाधिकाऱ्यांना रजेचा अर्ज देऊन वाळू तस्करीसाठी गावाकडे आला होता. ही संपूर्ण वाळू तस्करीची कारवाई भंडाऱ्याच्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

Sand Smuggling : कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाला अडथळा आणून वाळूचा टीप्पर पळविला

मिळलेल्या माहितीनुसारवाळू तस्करीची माहिती मिळताच लाखनीचं पोलीस पथक घटनास्थळाकडे पोहोचत असल्याची माहिती या वाळू तस्करांना झाल्यानंतर त्यांनी ओमनी व्हॅननं पोलिसांच्या वाहनाला अडथळा निर्माण करून वाळूनं भरलेला टिप्पर पळून जाण्यास मदत केली. मागील आठवड्यात भंडाऱ्यातही अशाच प्रकार वाळू तस्करांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाला अडथळा निर्माण करून त्यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात लाखनी पोलिस आता पळून गेलेला टिप्पर आणि त्याचा चालक आणि मालकाचा शोध घेत आहे. वाळू तस्करीत वन कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याने आता प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Bhandara Crime News : महामार्ग रोखून धरणाऱ्या 35 संगणक ऑपरेटरांवर भंडाऱ्यात गुन्हा दाखल

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले संगणक ऑपरेटरांचं वर्षभरापासून मानधन रखडलं होतं. ते मिळावं यासाठी दोघांनी जिल्हा परिषद भंडारासमोर अन्नत्याग आंदोलन केलं. तर, उर्वरित संगणक ऑपरेटरांनी मुंबई – कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करत महामार्ग रोखून धरला होता. भंडारा जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश असतानाही या संगणक ऑपरेटर आणि एकत्र येत कन्हाई आदेशाचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका या संगणक ऑपरेटरांवर भंडारा पोलिसांनी ठेवला आहे. याप्रकरणी भंडाऱ्यात 35 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.