सभापती झाला रे… नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचाही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेस

भंडारा : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या काँग्रेसचा (congress) विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता काँग्रेसने खास रणनिती आखायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे विधानसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा होती. मात्र, सध्या काँग्रेसचं नेतृत्व नाना पटोलेच करत आहेत. त्यातच, आता नाना पटोलेंच्या भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडणुकांवेळी चांगलाच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. तर, नशीबानेही काँग्रेसला साथ दिल्याने सभापती पदावर काँग्रेसचा हात स्थिर स्थावर झाला आहे. भंडारा जिल्हा परिषदवर संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सदस्य फोडून सभापती पदावर सत्ता मिळवली.

भंडारा जिल्हा परिषदमध्ये विषय समितीच्या चार सभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यात चारही सभापती हे ईश्वरचिठ्ठीनं निवडून आले आहेत. भंडारा जिल्हा परिषदमध्ये 51 सदस्य असून सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेश पाटील हे गैरहजर राहिल्यानं 50 सदस्य सभागृहात बसले होते. काँग्रेसकडं 21 सदस्य आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 4 सदस्य फोडून जिल्हा परिषदवर सत्ता मिळविली. भाजपचा एक सदस्य सभागृहात नं पोहोचल्यानं संख्याबळ 25-25 असे होते. त्यामुळे ही निवडणूक ईश्वरचिठ्ठीनं पार पडली. यात काँग्रेसच्या एक तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सभापती झाले आहेत. गणेशपुर येथील अनिवेष पराग मेहर यांनी या सर्व ईश्वरचिट्ठी काढल्यात. या सभापतीपदाच्या निवडणुकींमुळे नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवलं. या निवडणुकीत महायुतीचे आमदार राजू कारेमोरे, आमदार परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, सदस्य फोडण्यात नाना पटोले हे वरचढ ठरले आहेत.

हे आहेत सभापती

शीतल राऊत – समाजकल्याण सभापती (काँग्रेस)
नरेश ईश्वरकर – बांधकाम सभापती (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
अनिता नलगोपुलवार – महिला व बालकल्याण सभापती (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
आनंद मलेवार – शिक्षण व आरोग्य सभापती (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)

हेही वाचा

परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल; 12 वी परीक्षेदरम्यान उपप्राचार्यांना भीती

अधिक पाहा..

Comments are closed.