भास्कर जाधव नागपूरच्या हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या नेत्याला भेटले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


भास्कर जाधव यांनी घेतली प्रताप सरनाईक यांची भेट गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असलेले कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarniak) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि प्रताप सरनाईक यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नागपूरच्या एका हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली. हॉटेलच्या लॉबीत बोलत असतानाचा या दोघांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे उरलेसुरले शिलेदार गळाला लावण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) पुन्हा सुरु केल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या गोटातील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics news)

भास्कर जाधव यांच्यासोबतच्या या भेटीबाबत प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, नगरविकास राज्यमंत्री असताना मी भास्कर जाधव यांच्याकडे माझी कामं घेऊन जायचो. आमदार हा मंत्र्यांकडे जात असतो. मंत्री कुठल्या पक्षाचा आहे, हे आमदार बघत नसतो. भास्कर जाधवांच्या विधानसभा मतदारसंघात एसटी बससंदर्भात काही अडचणी आहेत. त्यांच्या भागात एसटी बस सुरु करायची आहे. एसटी महामंडळातंर्गत त्यांना माझ्याकूडन काही मदत हवी असेल तर मी मदत करेन. त्याचा ऑपरेशन टायगरशी संबंध नाही. ऑपरेशन टायगर हे सुरु आहे. मात्र, आमची भेट त्यासाठी नव्हती, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याबाबत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे हे भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता होऊन देणार नाहीत, अशा आशयाचे वक्तव्य केले. भास्कर जाधव आक्रमक नेते आहेत. त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेचा दांडगा अनुभव आहे. त्यांना शिवसेना उबठा ने फक्त पत्र देऊन ठेवले आहे. मात्र खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेते करण्याची वेळ येईल तेव्हा काय होईल ते समोर येईलच असे, उदय सामंत म्हणाले. या टीकेला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. या आणि जा याला काही अर्थ नाही. भास्कर जाधव हे पदासाठी इकडे – तिकडे जाणारे नेते नाहीत. त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे. ते उदय सामंत यांच्यासारखे खुर्ची पाहून पाळलेले नेते नाहीत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

आणखी वाचा

पैसे वाटपाचे आरोप, मालवणमधील प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं; निलेश राणे-रवींद्र चव्हाण समोरा-समोर येताच काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.