भास्कर जाधव म्हणाले, मला आतमध्ये टाकण्यासाठी फोन; गृहराज्यमंत्री कदमांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईतील (Mumbai) दादर भवन येथे कोकणातील चाकरमान्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना गुहागर मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर, स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच, रामदास कदम यांच्यावर टीका करताना आपल्याला अटक करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केल्याचा गौप्यस्फोटही भास्कर जाधव यांनी केला होता. आता, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री योगेश कदम (योगेश कदम) यांनी भास्कर जाधव यांच्या आरोपाला आणि टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
भास्कर जाधव यांनी मेळाव्यात केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, भास्कर जाधव यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये, असे म्हटले. भास्कर जाधव यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न होता का, असा सवाल गृहराज्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, भास्कर जाधव यांचा मतदारसंघ माझ्या शेजारी आहे, मी कधीही त्यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यांच्या मतदारसंघातील काही गावे आधी आमच्या वडिलांच्या मतदारसंघात होती. त्यांचा अजूनही आमच्यावर विश्वास आहे. माझे वडील 20 वर्षे तिथेआमदार तिथ. पण, मी कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यामुळे, प्रत्येक गोष्टीत जाधव यांनी राजकारण पाहू नये, अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली. भास्कर जाधव यांनी सांगितलेला किस्सा अजून आठवत आहे. काही लोकांनी असं देखील म्हटल होतं की, तो हल्ला त्यांनी स्वत घडवून आणला होता. तर, दुसरा मुद्दा ब्राह्मण समाजाबाबतचा, त्यावर मी बोलणार नाही, असेही योगेश कदम यांनी स्पष्ट सांगितले.
एकनाथ शिंदे काश्मीर दौऱ्यावर
दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगलं बाँडिंग आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीर दौऱ्यावर होते, त्यामुळे ते आज कॅबिनेट बैठकीला आले नव्हते, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली. तर, ठाकरेंच्या आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर, आम्ही त्यांच्या टीकेला कामातून उत्तर देऊ, आम्ही त्यांच्या टिकेकडे लक्ष देत नाहीत, असेही कदम यांनी म्हटले.
रेकॉर्डब्रेक भरती आम्ही करत आहोत
मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून 17 हजार, 18 हजार आणि आता 15 हजार पोलिसांची भरती आम्ही करत आहोत. पाच वर्षात रेकॉर्डब्रेक भरती आम्ही करत आहोत. कायदा सुव्यवस्था प्रश्न हाताळताना पोलिसांवर ताण येत होता, आता हे होणार नाही. त्यामुळेच, आजचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला असून लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
हेही वाचा
रोहित पवार अत्यंत खोटारडा माणूस; व्हॉईस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरुन पलटवार, आमदारांनीही शेअर केलं पत्र
आणखी वाचा
Comments are closed.