आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंना धक्का; मुंडेंचे निकटवर्तीय माजी आमदार भीमराव धोंडे अजित पवारां


भीमराव धोंडे पंकजा मुंडे बीड न्यूज : बीडच्या आष्टी मतदार संघातून ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Beed Politics News) तोंडावर मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना एक धक्का बसला आहे. मुंडेंचे निकटवर्तीय माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao Dhonde) यांची राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश निश्चिती झाली आहे.

11 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भीमराव धोंडे आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत. आष्टी मतदार संघात भीमराव धोंडे चार वेळा आमदार राहिले आहेत. 2014 च्या निवडणुकीत ते भाजपा कडून विजयी झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंनी स्वतः प्रयत्न केले. मात्र भाजपाने सुरेश धस यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरी करत भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढली. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर भीमराव धोंडेंचा पक्षप्रवेश पंकजा मुंडेंचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो.

काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आष्टी मतदार संघात त्या स्वतः लक्ष देणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु आता त्यांचे निकटवर्तीय अजित पवारांच्या गटात जातायत. त्यामुळे पुन्हा नव्याने कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे आव्हान पंकजा मुंडे यांच्या समोर असणार आहे.

भीमराव धोंडे यांची राजकीय कारकीर्द- (Bhimrao Dhonde political career)

  1. 1980 साली अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले.
  2. 1985 साली काँग्रेसकडून निवडणूक लढून विजयी झाले.
  3. 1990 साली पुन्हा काँग्रेस कडून विजयी झाले.
  4. त्यानंतर 2014 साली दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून भाजपाकडून भीमराव धोंडे यांचा विजय झाला.
  5. मात्र 2024 मध्ये पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
  6. त्यामुळे बंडखोरी करत भीमराव धोंडे निवडणुकीला सामोरे गेले मात्र त्यांचा पराभव झाला.
  7. आष्टी मतदार संघात सध्या कडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप परवाऱ्यावरून आमदार धस आणि धोंडे यांच्यात संघर्ष निर्माण आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

आणखी वाचा

Comments are closed.