हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात काँग्रेस शहराध्यक्षांची राहुल गांधी यांच्याकडे तक्रार

ठाणे: भिवंडी महापालिका महापौर पद निवडणुकीच्या तोंडावर भाजप मध्ये दोन गट पडल्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी शराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे.यासंदर्भातील लेखी तक्रार मोमीन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.शहराध्यक्षांच्या या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली असल्याचे बोलले जात आहे.

भिवंडी महापालिकेची नगरसेवक संख्या 90 असून काँग्रेसचे 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 असे 42 चे संख्याबळ असून महापौर पदासाठी केवळ चार सदस्यांची आवश्यकता आहे. मात्र, याबाबतच्या वाटाघाटी करण्याच्या कोणत्याही सूचना मला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिल्या नाहीत, असा आरोप भिवंडी काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकी आधी काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले.  आता रईस शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

काँग्रेस शहराध्यक्षांच्या या तक्रारीमुळे भिवंडीत नेमकी काय घडामोडी घडतील आणि प्रत्येक्ष कुणाचा महापौर होणार हे शुक्रवारी होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकी नंतरच स्पष्ट होणार आहे.

भिवंडी महापालिका महापौर व उपमहापौर पदाची निवड 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे . महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 30,भाजपा 22, राष्ट्रवादी 12 शिवसेना 12 समाजवादी 6 कोणार्क विकास आघाडी 4 भिवंडी विकास आघाडी 3  अपक्ष 1 अशी संख्याबळ आहे.

भिवंडीत वेगवान घडामोडी

भाजपचे उमेदवार नारायण चौधरी नाराज झाले व त्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंट मध्ये जाण्याचे निर्णय घेतला .  तसेच भाजपचा नऊ जणांचा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला देखील गेले.

काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार नारायण चौधरी व त्यांचे सहकारी मिळून महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठता येतो त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आज व्हिप जारी केला आहे. ज्यामध्ये नारायण चौधरी यांना महापौर तर काँग्रेसचे तारीक मोमीन यांना उपमहापौर साठी मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे.

भिवंडीमधील पक्षीय बलाबल

काँग्रेस – 30 जागा

भाजप – 22 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस – 12 जागा

शिवसेना – 12 जागा

समाजवादी पक्ष – 6 जागा

कोणार्क विकास आघाडी – 4 जागा

भिवंडी विकास आघाडी – 3 जागा

अपक्ष – 1 जागा

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.