टीईटी पेपरफुटी प्रकरण! आग्र्यातून तीन आरोपींना अटक, गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय
TET पेपर लीक प्रकरणाच्या बातम्या : भिवंडी टीईटी पेपर फुटी प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखीन तीन जणांना अटक करण्यात आलं आहे. नरेशकुमार पुरणचंद माहोर , संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा , बाबूलाल नारायणसिंह कुशवाहा असे अटक आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींना आग्रा येथून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत टीईटी फुटी प्रकरणांमध्ये दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आग्रा येथून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय
महिम पत्रण प्रा. लि. प्रिंटिंग प्रेस आग्रा येथून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना भिवंडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींना 9 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत टीईटी फुटी प्रकरणांमध्ये दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा तसेच इतर राज्यांपर्यंत पोहोचत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या चेकची पडताळणी, आर्थिक व्यवहार, इतर साथीदार आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा तपास सुरू आहे. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक व (SIT) स्थापन करण्यात आले असून राज्यभरातील नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
तपासासाठी एसआयटी स्थापन
या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा तसेच इतर राज्यांपर्यंत पोहोचले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तांच्या गुन्हे शाखेमार्फत (Crime Branch) या प्रकरणासाठी विशेष तपास पथक म्हणजेच ‘SIT’ स्थापन करण्यात आले आहे. डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हे पथक राज्यभरातील आणि देशातील या नेटवर्कचा शोध घेत आहे.
आरोपींवर ‘मकोका’ लावण्याच्या हालचाली
हे रॅकेट अत्यंत संघटित पद्धतीने चालवले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर अत्यंत कडक कारवाई करण्यासाठी आणि रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी ‘मकोका’ (MCOCA महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याच्या संदर्भात सध्या कायदेशीर तपासणी आणि पडताळणी सुरू आहे. तपासासाठी पोलिसांची विशेष पथके हरियाणा, बिहार आणि दिल्लीला रवाना झाली असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
Comments are closed.