भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड, ‘किंगमेकर’ विलास पाटलांना पोलिसांनी उचललं, नेम
भिवंडी विलास पाटील अटक भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या (Bhiwandi Mayor Election 2026) पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भिवंडीचे माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील (Vilas Patil) यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने काल (दि. 13 फेब्रुवारी) रात्री अटक केली आहे. या कारवाईमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल असलेल्या एका फसवणूक प्रकरणात विलास पाटील यांना अटक केली असून, घरे देण्याच्या बहाण्याने अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण 2025 मध्ये दाखल झाले होते. अटकेनंतर विलास पाटील यांना आज भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Bhiwandi Vilas Patil Arrest: महापौर निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई
विलास पाटील हे कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख नेते असून, त्यांच्या आघाडीचे भिवंडी महापालिकेत पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे कोणार्क विकास आघाडी ही सध्या भिवंडीतील सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर ठरत आहे. महापौर कोणाचा होणार, याबाबत सुरू असलेल्या रस्सीखेचीत विलास पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. महायुतीत ‘ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर’ असे सूत्र ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार कोणार्क विकास आघाडी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्याच दरम्यान विलास पाटील यांना अटक झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Bhiwandi Vilas Patil Arrest: राजकीय वाद आणि अटक, चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वीच विलास पाटील आणि भाजप आमदार महेश चौगुले यांच्यात भर रस्त्यात जोरदार वाद झाला होता. त्या घटनेनंतर आता झालेली अटक ही राजकीय खेळी असल्याची चर्चा भिवंडीत रंगू लागली आहे. भाजपाने ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्यांच्या विनंतीला मान देत कोणार्क विकास आघाडी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्याआधीच विलास पाटील यांना अटक झाल्याने संपूर्ण राजकीय चित्रच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Bhiwandi Vilas Patil Arrest: भिवंडीच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता
महापौर निवडणुकीच्या अगदी तोंडावर झालेल्या या अटकेमुळे भिवंडी महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या गणितावर मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. कोणार्क विकास आघाडीची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bhiwandi Election Results 2026 : भिवंडी महापालिका पक्षीय बलाबल
काँग्रेस – 30
समाजवादी – 6
राष्ट्रवादी (शपथ)- १२
भाजप – 22
शिवसेना (शिंदे) – 12
शिवसेना(ठाकरे) –
कोणार्क विकास आघाडी – 4
भिवंडी विकास आघाडी – 3
अपक्ष -1
भिवंडी एकूण जागा- 90
बहुमत आकडा- 46
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.