IND vs AFG: दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘हा’ स्टार गोलंदाज उर्वरित मालिकेतून बाहेर

सध्या टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना टीम इंडियाने जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे कारण, स्टार गोलंदाज 35 वर्षीय वरुण चक्रवर्ती (Varun Chakrawarthy ruled out of the T20 series against Afganistan) या मालिकेतून बाहेर झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तो सातत्याने दुखापतींचा सामना करत आहे. आयपीएल 2026दरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र दुखत असतानाही त्याने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळणे सुरू ठेवले होते.
यानंतर त्याने (BCCI) बीसीसीआयच्या बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (COE) उपचार आणि पुनर्वसन केले. त्यामुळे तो आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकला नव्हता. मात्र इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याने पुनरागमन केले.
मात्र त्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याला मांडीच्या मागील बाजूला (हॅमस्ट्रिंग) दुखापत झाली. त्यामुळे त्याला पुन्हा मालिकेतून बाहेर पडावे लागले आणि BCCIच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसनासाठी जावे लागले.
आता अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून वरुणने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. 13 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात तो भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होता. त्याने 4 षटकांत 16 धावा देत 1 विकेट घेतली. मात्र या सामन्यानंतर तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला असून अफगाणिस्तानविरुद्धच्या उर्वरित टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे.
वरुणला यावेळी नेमकी कोणती दुखापत झाली आहे आणि ती किती गंभीर आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र पुनर्वसनानंतर केवळ एकच सामना खेळल्यानंतर तो पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने BCCIच्या सेंटर ऑफ एक्सलेन्सच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Comments are closed.