अंजली भारतीला अटक करा,तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक

नागपूर : त्यामुळे म्हणतात गायक अंजली भारतीला अटक करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारू असा स्पष्ट इशारा भाजपच्या महिला आघाडीने दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील फुलमोगरा येथे झालेल्या मेळाव्यात कथित गायिका अंजली भारतीची जीभ घसरली होती आणि लातूरच्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेचा उल्लेख करताना अंजली भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (फडणवीस) यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video) झाल्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्षाच्या महिलांकडून अंजली भारतींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, भाजप महिला आघाडी आकमक बनली नसून मीरा भाईंदरमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

अंजली भारतीचे वक्तव्य एका महिलेने दुसऱ्या महिले संदर्भात अजिबात बोलू नये अशा स्वरूपाचे आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी संदर्भात अंजली भारती असं बोलू शकत असेल, तर राज्यातील सामान्य स्त्रियांबद्दल तिचे विचार कसे असेल असा सवाल भाजपच्या महिला आघाडीने विचारला आहे. जर अंजली भारतीच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही, तिला अटक केली नाही तर नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोड येथे एक फेब्रुवारी रोजी होणारा अंजली भारतीचा कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशाराच महिला आघाडीने दिला आहे. यासंदर्भात भाजप महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले.

मीरा भाईंदरमध्ये पोलीस तक्रार दाखल

गायिका अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीविरोधात मिरा भाईंदर भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. मिरा भाईंदर भाजप महिला जिल्हाध्यक्षा वैशाली भोईर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कनकिया पोलीस ठाण्यात जाऊन अंजली भारतीविरोधात लेखी तक्रार दाखल केली. महिलांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, दोषींवर कारवाई होईपर्यंत भाजप शांत बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा

ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही

आणखी वाचा

Comments are closed.