सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर वादावर भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांची पोस्ट; म्हणाले, ‘होय.
नाशिक: शिवसेना ठाकरे गटाने हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत नाट्यमय घडामोडी घडामोडींना वेग आला आहे. एका बाजुला बडगुजर हे हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला भाजप प्रवेशासाठी रवाना झालेत, काही वेळातच त्यांच्या पक्षप्रवेशाची कार्यक्रम पार पडेल. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मात्र मला पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही माहिती नाही असं सांगितलं. यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याचंही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं. या घडामोडींवर नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले भाजप शहराध्यक्ष?
नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून म्हटलंय, होय. भाजप वॉशिंग मशिन आहे. इतर राजकीय पक्षांमधुन भाजपात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यास काहीही अटी शर्ती नाही. त्याकरिता मो.नं.8800002024 डायल करून ऑनलाईन पद्धतीने देशातील कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होता येते. तथापि भाजपची कार्यपद्धती पहाता जे-जे पक्षात येतील त्यांच्या कोणत्याही अटी शर्ती नसतील. त्यांना भाजपची कार्यपद्धती, ध्येय धोरणे अंगिकारावीच लागतील. तरच ते भाजपात येतील. इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. त्यानुसार वॉशिंग मशीनचा अर्थच असा आहे की त्यांनी मागचा इतिहास सोडुन भाजपची कार्यपद्धती अंगिकारली पाहिजे. त्याप्रमाणे जर भाजप करत असेल तर काय हरकत आहे.शेवटी लोकशाही पध्दतीच्या राजकारणात डोक्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्व त्या पक्षात डोके किती संख्येने जास्त आहेत ते पण तितकेच महत्वाचे आहे.तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार विश्वासदर्शक ठरावात एका मताने पडले होते.त्यानंतर पंतप्रधान पदाच्या पदावर संगीत खुर्चीचा खेळ सुरु झाला होता.त्यामुळे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपात कोणी येत असेल व पक्षाची रचना व कार्यपद्धती अंगिकारत असेल तर काय हरकत आहे, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
आणखी वाचा
Comments are closed.