अँजिओग्राफीचा रिपोर्ट येताच जगदीश मुळीक धास्तावले, देवाभाऊंचा एक फोन अन् चक्रं फिरली, लहान भावा
पुणे: भाजप नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांची नुकतीच अँजिओग्राफी पार पडली, दुसऱ्या दिवशी बायपास सर्जरी करण्यात आली, या दरम्यान त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्र्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेला फोन आणि आलेला अनुभव मुळीक यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती. मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी डॉक्टरांशी स्वतः संवाद साधला, उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि आज, ऑपरेशननंतर काही दिवसांनी, स्वतः भेट द्यायलाही आले. त्यांच्या या भेटीतून मिळालं ते फक्त आशीर्वाद नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मविश्वासाचा अनमोल आधार असं म्हणत त्यांनी संपूर्ण प्रंसग सांगितला आहे.(Jagdish Mulik)
Jagdish Mulik Social Media: जगदीश मुळीक यांची सोशल मिडीया पोस्ट
देवेंद्रजी फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर कार्यकर्त्यांना भावासारखे समजणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला अशाच नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व आपल्याला देवभाऊंच्या रूपाने लाभले आहे.
भावाप्रमाणे प्रेम करणारे देवाभाऊ!
कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. अलीकडे मी माझी सीटी अँजिओग्राफी करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट चुकीचा आल्याने पुण्यातील डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मी तात्काळ आपल्या महाराष्ट्राचे… pic.twitter.com/uMUrQemChk
— जगदीश मुळीक (@jagdishmulikbjp) 12 नोव्हेंबर 2025
Jagdish Mulik Social Media: भावाप्रमाणे प्रेम करणारे देवाभाऊ!
कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. अलीकडे मी माझी सीटी अँजिओग्राफी करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट चुकीचा आल्याने पुण्यातील डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मी तात्काळ आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) यांना फोन केला.फक्त तीन मिनिटांतच देवाभाऊंनी स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधून मला परत फोन केला आणि शांतपणे सांगितले, “जगदीश, उद्या दुपारी चार वाजता डॉ. रमाकांत पांडा यांना भेट, मग पुढचं आपण ठरवू.” दुसऱ्या दिवशी मी डॉ. पांडा यांना भेटलो. त्यांनी तपासणी करून तात्काळ अँजिओग्राफी केली आणि परिस्थिती लक्षात घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. पुढच्या दिवशीच माझी बायपास सर्जरी करण्यात आली. हे सर्व इतकं अचानक आणि तातडीचं झालं की कोणाशी काही बोलण्यासही वेळ मिळाला नाही. त्या संपूर्ण काळात माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी माझ्यासोबत ठाम उभे राहिले.
Jagdish Mulik Social Media: देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी
या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती. मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी डॉक्टरांशी स्वतः संवाद साधला, उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि आज, ऑपरेशननंतर काही दिवसांनी, स्वतः भेट द्यायलाही आले. त्यांच्या या भेटीतून मिळालं ते फक्त आशीर्वाद नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मविश्वासाचा अनमोल आधार.
देवेंद्रजी फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर कार्यकर्त्यांना भावासारखे समजणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला अशाच नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व आपल्याला देवभाऊंच्या रूपाने लाभले आहे. या काळात माझ्या उपचारासाठी तत्परतेने मदत केलेल्या डॉ. रमाकांत पांडा तसेच त्यांची संपूर्ण टीम, डॉ. ज्ञानेश गवारे आणि डॉ. अभिजित लोढा यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या कौशल्यपूर्ण सेवेमुळे आणि देवभाऊंच्या संवेदनशील तत्परतेमुळे आज मी पुन्हा एकदा बळकट उभा आहे. माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे, कार्यकर्त्यांचे आणि सर्व जनतेचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद याबद्दल मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे. सध्या माझी तब्येत सुधारते आहे आणि काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मी लवकरच पुणेकरांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे.आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आणखी वाचा
Comments are closed.