सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात, पण मुस्लीम दहशतवादी म्हणताना…; भाजपने आव

जितेंद्र ओवाड आणि रोहित पवार वर भाजपा: काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj Chavan) यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ नव्हे तर ‘सनातनी दहशतवाद’ असं म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी “सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं आहे,” असे वक्तव्य केले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील यवत येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दोन समाजात तेढ निर्माण झाला होता. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप नेत्यांच्या सभेमुळे यवतमध्ये तणाव वाढला, असा आरोप केला होता. आता यावरून भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, रोहित पवार व जितेंद्र आव्हाड यांचा हिंदू द्वेष आणि मतांच्या राजकारणासाठीचं लांगूलचालन काही कमी होत नाही. जी उदाहरणे आव्हाड, पवार देतात, हिंदू समाजात त्यांचं कोणी समर्थन करत नाही. तर त्यांना गुन्हेगारच समजतात. पण दहशतवाद्यांचे कौतुक याच आव्हाडांनी केले होते. इशरत जहॅा विसरलात का? बाटला हाऊस येथे दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाल्यावर सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू आले होते. पवित्र त्यागी अशा भगवा रंगावरून दहशतवाद हा शब्द काँग्रेसने आणत हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न केला.

जितेंद्र आव्हाडांवर टीका

जितेंद्र आव्हाड ‘सनातनी दहशतवादी’ अशी बरीच पोपटपंची केलीत. पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा एकदा मुस्लिम दहशतवादी असा उल्लेख करून निषेध करून दाखवा. सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि मुस्लिम दहशतवादी म्हणताना काय फुटते की फाटते? इशरत जहाँचा गौरव करणाऱ्या बाटग्यांना सनातन धर्माबद्दल बोलायचा नैतिक अधिकारच नाही, अशी टीका त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.

रोहित पवारांवर हल्लाबोल

रोहित पवार दौंडमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा अपमान झाला, तेव्हा हिंदू आठवले का? तुमचे सरकार असताना हनुमान चालिसा म्हटल्याबद्दल नवनीत राणा यांना तुरुंगात डांबले तेव्हा, हिंदू आठवले का? आता हिंदू दहशतवादाचा नॅरेटीव्ह पसरविण्यासाठी हिंदू शेतकरी आणि युवकांची तुम्हाला आठवण आली. असल्या ढोंगीपणाला जनता फसणार नाही. तुमचे खरे रूप हिंदू समाज ओळखून आहे, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी रोहित पवार यांच्या हल्लाबोल केलाय.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Jitendra Awhad : सनातन धर्म विकृत, भारताचं वाटोळं केलं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य; भाजपकडून टीकेची झोड

आणखी वाचा

Comments are closed.