चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्यासाठी मुंबईत मंथन; दिग्गज नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक
चंद्रपूर महानगरपालिका: चंद्रपूर महापालिकेत महापौर बसवण्यासाठी भाजपच्या गोटातून जोरदार हालचाघेतला करण्यात येत आहे. अशातच आता भाजपचे नेते (भाजप) आणि मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांच्या बंगल्यावर थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar), आमदार किशोर जोरगेवार, बंटी बागडिया उपस्थित असणार आहे. चंद्रपूर महापालिकेत 34 हा बहुमताचा आकडा असून यामध्ये भाजप 24, ठाकरे गट 6, वंचित 2, इतर 2 अशा फाॅर्म्युल्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
Vijay Wadettiwar : चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसेल, विजय वडेट्टीवार यांचा दावा
एकीकडे काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार आणि प्रतिभा धानोरकर गटाच्या वादामुळे चंद्रपूर महापालिकेत बहुमत असताना काँग्रेसच्या याच अंतर्गत वादाचा फायदा घेत आता भाजपाकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली करण्यात येत असल्याचे दिसून आलं आहे. दुसरीकडे चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसेल असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चंद्रपुरात सत्ता काँग्रेस स्थापन करणार असून काँग्रेसचाf आणि महापौर होणार आणि तर असा होईल हे येणारा काळ सांगेल. असेही विजय वडेट्टीवार म्हणालेत.
Chandrapur Mayor : काँग्रेस, भाजप नगरसेवकांची गट नोंदणी देखील लांबणीवर पडण्याची शक्यता
अशातचनागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदवण्यात आलेल्या काँग्रेसच्या 13 नगरसेवकांच्या गटात उर्वरित 14 नगरसेवक आज सामील होणार नाही. शुक्रवारी संध्याकाळी नोंदणी करण्यात आलेल्या धानोरकर समर्थक 13 नगरसेवकांच्या गटावर वडेट्टीवार समर्थक असलेल्या 14 नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला आहे. या आक्षेपावर नागपूर विभागीय आयुक्त आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाची कायदेशीर बाजू तपासून नंतरच वडेट्टीवार समर्थक या गटात सामील व्हायचं की नाही याबाबत निर्णय घेणार आहेत. तर दुसरीकडे भाजप नगरसेवकांची गट नोंदणी देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याबाबत सुरू असलेला पेच सुटल्यानंतरच भाजप नगरसेवक गट नोंदणी करणार असल्याची माहिती सूत्रेni दिली आहे.
Sudhir Mungantiwar : काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात, नगरसेवकांची भाजप सोबत येण्याची इच्छा
दरम्यान, काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांची भाजप सोबत येण्याची इच्छा आहे. शिवाय चंद्रपुरात भाजपचाच महापौर बसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद आणि दोन वर्ष स्थायी समितीसाठी आम्ही तयार होतो. मात्र त्यांना महापौर पद हवं आहे. त्यामुळे या अनुषंगानेही संवाद सुरू असल्याचेही ते म्हणाले. सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेत यश आलं तर निश्चित महापौर आमचाच होईल असा दावाही त्यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.