पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्य
महाराष्ट्रात भाजप एसआरआय प्रक्रिया: गेल्या 15 वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये जंगजंग पछाडूनही यश न मिळालेल्या भाजपला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असे यश मिळाले आहे. 2016 आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) शह देण्यासाठी साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांचा वापर केला होता. मात्र, ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपची डाळ शिजून दिली नव्हती. मात्र, पश्चिम बंगालमधील यंदाची विधानसभा निवडणूक (Assembly Election 2026) ही भाजपसाठी गेमचेंजर दिली होती. भाजपने या निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. तर गेली 15 वर्षे सत्तेत असलेला तृणमूल काँग्रेसला 100 जागांचा आकडाही गाठता आला नाही. भाजपच्या या यशात अनेक घटक कारणीभूत असले तरी निवडणूक आयोगाची विशेष मतदार पुनरावलोकन (SIR) मोहीम ही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर खऱ्या अर्थाने प्रभाव टाकणारी ठरली. या मोहीमेतंर्गत तब्बल 90 लाख मतदारांची नावे यादीतून हटवण्यात आली होती. यापैकी मोजक्याच मतदारांना पुन्हा अर्ज केल्यानंतर यादीत समाविष्ट करुन घेण्यात आले. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची ही एसआरआय मोहीम एकप्रकारे पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी फलदायी ठरली. त्यामुळे आता भाजप महाराष्ट्रातही हेच धोरण राबवण्याच्या तयारीत आहे. (Maharashtra Politics news)
पश्चिम बंगाल काबीज केल्यानंतर महाराष्ट्रातदेखील एसआयआरवर भाजपकडून भर देण्यात येणार आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि नेते आज एसआयआरचे धडे गिरवणार आहेत. भाजपकडून एसआयआर संदर्भात दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात बुधवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एसआयआर संदर्भात कार्यशाळेचे आयोजन आले आहे.
BJP in Maharashtra: पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात भाजपची क्लिनस्विप मोहीम
पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्रात बोगस मतदार शोधून काढण्यासाठी एसआयआर मोहीम राबवली जाणार आहे. एसआयआरच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी भाजपकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील प्रशिक्षण शिबिरात नेत्यांकडून एसआयआरबाबत भाजप पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
पदाधिकारी प्रशिक्षणानंतर आता लोकप्रतिनिधींना देखील भाजप प्रशिक्षण देणार आहे. पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विभागीय प्रशिक्षण दिले जाईल. टप्प्याटप्प्याने पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार – खासदार आणि मंत्र्यांना एसआयआर मोहिमेसाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसआयआरबाबत आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करतील. भाजपच्या या मोहीमेचा 2029 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.