रामदास आठवलेंनी मुंबईत 39 उमेदवार उतरवताच भाजप-शिंदे गटाचा मोठा निर्णय, रिपाइंला किती जागा सोडल

BMC निवडणूक 2026: मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीत (BJP and Shiv Sena Alliance) केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  (Ramdas Athawale) यांच्या रिपाइंची (RPI) देखील एन्ट्री झाली आहे. भाजप आणि शिवसेना रिपाइंसाठी प्रत्येकी सहा-सहा जागा सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती समोर येत आहे. मुंबईमध्ये भाजप 137 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 90 जागांवर लढत आहे. दोन जागांवर एबी फॉर्मचा घोळ झाल्याने तिथे युतीचा एकही उमेदवार नाही. रामदास आठवले यांच्या रिपाइंची युतीत एन्ट्री झाल्यानंतर भाजपा 131, शिवसेना 84 आणि रिपाइं 12 असे जागा वाटपाचे गणित असणार आहे.

मुंबईत महायुतीत शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षाचेच जागावाटप झाले होते. या जागा वाटपात रिपाइंला स्थान न दिल्याने रामदास आठवले नाराज झाले होते. नाराज रामदास आठवले यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष रिपाइंसाठी सहा-सहा जागा देणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनीच दिली आहे.

BMC Election 2026: उर्वरित जागा रिपाइं अपक्ष लढवणार

रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षाने जवळपास 39 उमेदवारी अर्ज मुंबईतून दाखल केलेले आहेत. त्यामुळे या 12 जागा जर रामदास आठवले यांच्या पक्षासाठी सुटल्या तर उर्वरित जागा रिपाइं अपक्ष म्हणून स्वबळावर लढवणार असल्याचे देखील समजते. आता नक्की या जागा वाटपाबाबत काय निर्णय होणार याबाबत उद्यापर्यंत स्पष्टता येणार आहे.

Ramdas Athawale RPI Candidates in Mumbai: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबईतील उमेदवारांची यादी

  1. स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
  2. रॉबिन्सन मॅरॉन नयागम- प्रभाग 188
  3. बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
  4. सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
  5. रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
  6. दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
  7. ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
  8. प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
  9. संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
  10. संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
  11. निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
  12. गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
  13. विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
  14. मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
  15. श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
  16. मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
  17. नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
  18. सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
  19. विक्रांत विवेक पवार- 98 उत्तर मध्य मुंबई
  20. नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
  21. विनोद भाऊराव जाधव-104- उत्तर मध्य मुंबई
  22. रागिणी प्रभाकर कांबळे, 103- ईशान्य मुंबई
  23. राजेश सोमा सरकार- 120, ईशान्य मुंबई
  24. हेमलता सुनील मोरे- 118, ईशान्य मुंबई
  25. राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, 125, ईशान्य मुंबई
  26. भारती भागवत डोके, 133, ईशान्य मुंबई
  27. सतिश सिध्दार्थ चव्हाण, 140, ईशान्य मुंबई
  28. यशोदा शिवराज कोंडे, 28, उत्तर मुंबई
  29. अभिजित रमेश गायकवाड, 26, उत्तर मुंबई
  30. रेश्मा अबू खान, 54 उत्तर मुंबई
  31. छाया संजय खंडागळे 81 उत्तर पश्चिम
  32. अजित मुसा कुट्टी, 59- उत्तर पश्चिम
  33. जयंतीलाल वेलजी गडा, 65- उत्तर पश्चिम
  34. बाबू आशापा धनगर, ६३- वायव्य
  35. वंदना संजय बोरोडे, 38- वायव्य
  36. राधा अशोक यादव, 39- वायव्य
  37. प्रेमलता जितेंद्र शर्मा, 40- वायव्य
  38. धनराज वैद्यनाथ रोड, 43- वायव्य
  39. शिल्पा बेलमकर- प्रभाग क्रमांक 150

आणखी वाचा

Thane Mahanagarpalika Election 2026: ठाण्यात मनसे अन् ठाकरे गटाला धक्का, दोन उमेदवारांचे अर्ज बाद, अविनाश जाधव निवडणूक आयोगाला संतापून म्हणाले….

आणखी वाचा

Comments are closed.