मुंबईत दोन्ही राष्ट्रवादींचा गुप्त समझोता? शरद पवार गटातील इच्छूकांना अजितदादांकडे जाण्याचा सल्

BMC निवडणूक 2026 NCP: प्रचंड संभ्रम आणि उलटसुलट वळणे घेतल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र लढणार असल्याचे रविवारी रात्रीच स्पष्ट झाले. आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याठिकाणीही दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होऊ शकते. त्यानंतर आता मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाकडूनही एक वेगळाच पॅटर्न वापरला जात असल्याचे दिसत आहे. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)

मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत आघाडी झाली आहे. आधी शरद पवार गट काँग्रेस पक्षासोबत युती करण्याच्या तयारीत होता. मात्र, काँग्रेस आणि वंचितने तोंडाला पाने पुसल्यानंतर शेवटच्या क्षणी शरद पवार गटाने मुंबईत ठाकरे बंधूंशी युती केली होती. मात्र, जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाटेला 10 ते 12 जागा आल्याने पक्षातील इच्छूक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आपण उमेदवारांना तिकिट देऊ शकलो नाही म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव देखील प्रचंड नाराज झाल्या असल्याची माहिती आहे. ‘एबीपी माझा’च्या सूत्रांच्या माहितीनुसार, अखेर त्यांना पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांची ताटातूट होऊ नये म्हणून थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करा आणि निवडणूक लढा, असे सांगण्यात आले. याबाबत पक्ष कार्यालयातूनच उमेदवाराना फोन गेल्यामुळे अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनीबेन पंचाल, जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख, सरचिटणीस अशोक पांचाल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आजदेखील शरद पवार गटातील अनेक इच्छूक उमेदवार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील.

Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या गोटात अस्वस्थता का?

मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. जागावाटपात ठाकरे बंधूंनी राष्ट्रवादी(शप)च्या वाट्याला फक्त 10 ते 12 जागा सोडल्या आहेत. त्यामुळे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचाही प्रचंड भ्रमनिरास झाला आहे. मात्र, तसे घडल्यास मुंबईत ठाकरे बंधूंच्या व्होटबँकेत आणखी एक वाटेकरी निर्माण होऊ शकतो. शरद पवार गटाचे उमेदवार अजितदादांकडे गेल्यास ठाकरे बंधूंना मदत होण्याऐवजी त्यांचा तोटा होण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

आणखी वाचा

पवारांचा ‘पिंपरी पॅटर्न’ तयार; अजित दादांचा मास्टरस्ट्रोक, 128 जागांपैकी 110 जागा लढणार?, युती–मविआचा प्लॅन ‘होल्ड’वर

आणखी वाचा

Comments are closed.