नगरसेवक तुमचा असला तरी आम्हीच लढणार, जागावाटपात भाजपचा वेगळाच पॅटर्न, ‘त्या’ फॉर्म्युलाने शिंदे
बीएमसी निवडणूक शिवसेना शिंदे कॅम्प आणि भाजप जागावाटप: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपासाठी गुरुवारी दुसरी बैठक पार पडत आहे. मुंबईच्या दादर परिसरातील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात ही जागावाटपाची चर्चा होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वी जागावाटपासाठी भाजपने (BJP) अवलंबिलेल्या नव्या पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे शिंदे गटाकडून 227 पैकी निम्म्या जागांची मागणी केली जात असताना भाजपने उलट गेल्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या जागांवरही दावा सांगितला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने 2017 साली जिंकलेल्या 82 प्रभागांवरील दावा कायम ठेवला आहे. याशिवाय, 2017 साली बंडखोरीमुळे पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांना पडलेली मते आणि बंडखोर उमेदवाराला मिळालेली मतं तेथील शिवसेनेच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त असतील तर त्या जागेवरही भाजपकडून दावा ठोकण्यात आला आहे. ज्या वॉर्डमध्ये भाजपचे उमेदवार अत्यंत कमी फरकाने हरले आहेत, त्या प्रभागावरही भाजपकडून दावा सांगण्यात आला आहे. याशिवाय, 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीनुसार ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी असेल त्या क्षेत्रातील प्रभागांमधूनही आपलेच उमेदवार उभे करण्याची योजना भाजपने आखली आहे. मात्र, भाजपच्या या फॉर्म्युलाला शिंदे सेनेने विरोध केला आहे.
शिंदे गटाने भाजपचा दावा खोडून काढताना 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 2014 च्या आधारावर जागावाटप करणे योग्य नाही. त्यावेळची आकडेवारी आताच्या जागावाटपासाठी योग्य ठरणार नाही, असे शिंदे गटाने भाजपला निक्षून सांगितले आहे.
याशिवाय, भाजपने मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 8 विधानसभा क्षेत्रांमध्ये शिंदे गटाला एकही जागा सोडलेली नाही. यामध्ये वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मागाठाणे आणि घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच दादर, माहीम, वडाळा, चेंबूर आणि वरळी या मराठीबहुल भागांमध्येही भाजपने शिवसेनेसाठी कमी जागा सोडल्या आहेत. यावर शिंदे गटाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे आजच्या जागावाटपाच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होणयाची शक्यता आहे.
मराठी: एकनाथ शिंदेंनी 227 वॉर्डमधील इच्छुकांची बैठक बोलावली
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपशी जागावाटपाची बोलणी अपेक्षित पद्धतीने पार न पडल्यास एकनाथ शिंदे यांनी वेगळ्या मार्गाने जायचीही तयारी ठेवली आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव, दहिसर या भागांमध्ये शिवसेना शाखांना भेटी देत आहेत. तर बुधवारीच वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबईच्या सर्व 227 वॉर्डमधील इच्छूक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.