शिंदेंच्या शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी, प्रत्येकाला निवडून येण्याचा विश्वास

मुंबई : महापालिका निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना महायुतीच्या नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढल्याचं दिसतंय. यामध्ये सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी (Shivsena मराठी) केली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतून 35 ते 40 ठिकाणी बंडखोरी झाली आहे आणि प्रत्येकालाच आपण निवडून येण्याचा विश्वास आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसमोरील डोकेदुखी मात्र वाढली आहे. तर त्याचवेळी गोरेगाव दिंडोशीमध्ये विभागप्रमुखासह 200 जणांनी राजीनामा दिला आहे.

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असतानाही महायुतीच्या अनेक बंडखोरांनी अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले नाही.

BMC Election : बंडोबांचं आव्हान

अनेक बंडखोरांनी आम्ही निवडून येणार असल्याचं सांगत अर्ज मागे घेणार नाही अशी भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. या बंडखोरांना समजवण्यासाठी नेत्यांची एक फळीच कामाला लागली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसमोर बंडोबांचं मोठं आव्हान आहे.

Goregaon Dindoshi Shivsena : गोरेगाव-दिंडोशीमध्ये शिवसेनेला धक्का

शिंदेंच्या शिवसेनेचे गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभा प्रमुख गणेश शिंदे हे पक्षातील त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा देणार आहेत. मुलगी श्रेया शिंदे हिने अपक्ष अर्ज भरला आहे आणि ती माघार घेणार नाही अशी गणेश शिंदे यांची भूमिका आहे.

गणेश शिंदे यांच्यासह गोरेगाव हिंदूश्री विभागातील शाखाप्रमुख गटात प्रमुख आणि अनेक प्रमुख पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी गोरेगाव दिंडोशी भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे.

गोरेगाव विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षात नव्याने येणाऱ्यांना पदे आणि उमेदवारी दिल्यामुळे जुने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे विभाग प्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले.

गोरेगाव दिंडोशी भागात दोन्ही प्रभागात तयारी असताना एक जागा भाजप आणि एक जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. त्यामुळे सेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचं दिसून आलं.

प्रभाग 54 शिंदे गटाकडे असतानाही विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोपवल्याने असंतोष निर्माण झाल्याची माहिती आहे. विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी त्यांची उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे  महिला उपविभाग प्रमुख सोनल हडकर यांच्यासह शाखा समन्वयक व अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.