राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी…;
BMC निवडणूक निकाल 2026: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल (Maharashtra Municipal Election Results 2026) जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ‘शाहसेना’ असा शब्दप्रयोग करत शिंदे गटावर निशाणा साधलाय. तर 29 महानगरपालिकेतील भाजपच्या कामगिरीवरही त्यांनी बोचरी टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवूनसुद्धा मुंबईत भाजपला साधं शतकही गाठता आलं नाही. कोट्यवधींचा पाऊस पाडून फक्त चार…,” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
BMC Election Results 2026: भाजपचे नगरसेवक केवळ चारनेच वाढले
नगरसेवकांच्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी पुढे लिहिले आहे की, शिवसेना ठाकरे गटाकडे यापूर्वी 20 ते 25 नगरसेवक होते, तर यंदा हा आकडा थेट 65 वर पोहोचला आहे. मनसेचे सहा नगरसेवक मिळणे हा वेगळाच फायदा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, “शाहसेनेचे 53 नगरसेवक होते, ते आता 28 वर आले आहेत. भाजपचे 84 नगरसेवक होते, ते केवळ चारनेच वाढले आहेत,” असे म्हणत त्यांनी शिंदे गट आणि भाजपला डिवचले आहे.
गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाहीं..!!
कोट्यावधींचा पाऊस पाडून फक्त ४ …!!!शिवसेना UBT चे 20/२५ नगरसेवक होते. आज ६५ आहेत.
मनसेचे ६ नगरसेवक हा फायदा वेगळाच!
शाहसेनेचे ५३ नगरसेवक होते… आज २८ आहेत.
भाजपाचे ८४…
— सुषमाताई अंधारे (@andharesushama) १७ जानेवारी २०२६
BMC Election Results 2026: ‘27 महापालिका जिंकण्याचा दावा फोल’
भाजपने 27 महापालिका जिंकण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात भाजप केवळ 9 ठिकाणी स्वबळावर सत्ता स्थापन करू शकली असून, 15 ठिकाणी युतीच्या ‘कुबड्यावर’ उभे राहण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी, “काय भक्तुल्यानो, कळलं का? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही,” अशा उपरोधिक शब्दांत भाजपवर निशाणा साधला आहे. आता सुषमा अंधारेंच्या टीकेवर शिंदे गट आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.