ई-स्पोर्ट्सच्या रणांगणात कोरियाचा झेंडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत रंगलेल्या बीजीएमआय आंतरराष्ट्रीय चषक 2026 मध्ये संगीत आणि ई-स्पोर्ट्सचा अनोखा मेळ पाहायला मिळाला. जागतिक संगीतविश्वातील स्टार ऍलन वॉकरने बीजीएमआय अँथमचे थेट सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मुख्य भाषणातून हिंदुस्थानी ई-स्पोर्टस्च्या वाढत्या प्रतिष्ठsवर प्रकाश टाकला.

मैदानावरील सहा सामन्यांत कोरियाच्या नॉन्गशिम रेडफोर्सने 72 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. डिप्लस केआयए अवघ्या एका गुणाने मागे राहिला, तर किवूम डीआरएक्सने तिसरे स्थान मिळवले. हिंदुस्थानच्या आऊटरॅज ई-स्पोर्ट्सने 47 गुणांसह चौथे स्थान पटकावत चिकन डिनरवरही नाव कोरले. के-नाईन ई-स्पोर्ट्सनेही एक सामना जिंकत हिंदुस्थानची आव्हानाची धग कायम ठेवली.

Comments are closed.