गोलरक्षकाच्या धडकेत फुटबॉलपटूचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फुटबॉल विश्वाला हादरवणारी घटना घडली आहे. टेनेरिफे संघाचा स्ट्रायकर जीसस डी मिगेल याचा सामन्यादरम्यान झालेल्या धडकेनंतर मृत्यू झाला. एफसी अँडोराचा गोलरक्षक जीसस ओवोनो चेंडू अडवण्यासाठी गोलक्षेत्राबाहेर धावला असताना त्याची डी मिगेलशी टक्कर झाली. या धडकेत गोलरक्षकाचा गुडघा डी मिगेलच्या छातीला लागला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी स्पॅनिश पोलिसांनी संभाव्य अनैच्छिक मनुष्यवधाच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. मात्र तपास सुरू होणे म्हणजे गोलरक्षक दोषी ठरणे नव्हे. मैदानावरील अपघाती धडक आणि निष्काळजीपणा यांचा तपास केला जाणार आहे. या घटनेने शोककळा पसरली आहे.

Comments are closed.