अंजुमनने जनरल एज्युकेशनला 144 धावांत गुंडाळले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वेगवान गोलंदाज अनुज सिंगच्या भेदक माऱ्यापुढे जनरल एज्युकेशन अकादमीचा पहिला डाव अवघ्या 144 धावांत आटोपला. हॅरिस शील्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत गतविजेत्या अंजुमन अलायन्सने पहिल्याच दिवशी प्रतिस्पर्ध्यांना बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर उमर खुटेच्या नाबाद अर्धशतकामुळे अंजुमननेही 3 बाद 136 धावांची मजल मारत पहिल्या डावातील आघाडीच्या दिशेने कूच केले.

या लढतीत अंजुमनचा कर्णधार देवाशिष घोडकेचा गोलंदाजीचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अनुजने पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवत जनरल एज्युकेशनला हादरवले. शार्दुल फगारेने चिवट प्रतिकार केला, मात्र अंजुमनच्या गोलंदाजांनी त्यांचा डाव सावरू दिला नाही. आरुष कोल्हेनेही झुंज दिली. मग 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उमरने नाबाद अर्धशतक झळकवले. त्याने ओम जाधवसह 57 आणि देवाशिष घोडकेसह 60 धावांची भागीदारी केली. दिवसअखेर अंजुमनने 136 धावा केल्या असून पहिल्या डावातील आघाडीसाठी त्यांना केवळ आठ धावांची गरज आहे.

Comments are closed.